Weather Alert: महाराष्ट्रावर नवीन संकट, हवामान विभागाने स्पष्ट सांगितलं
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
विदर्भातील तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले असल्याने तेथील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. 8 एप्रिलसाठी विदर्भातील काही जिल्ह्यांना हीट वेव्हचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या 3 दिवसांत राज्यात विविध भागांतील तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. विदर्भातील तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असल्याने तेथील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. 8 एप्रिलसाठी विदर्भातील काही जिल्ह्यांना हीट वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे आणि नाशिकमधील तापमानात देखील वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
advertisement
पुण्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 8 एप्रिलला पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहून दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुण्यातील तापमानात देखील अंशतः वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
advertisement
advertisement
सर्वाधिक तापमान वाढ ही विदर्भातील जिल्ह्यांत झालेली दिसून येत आहे. 8 एप्रिलला नागपूरमधील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विदर्भातील अकोला आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांना 8 एप्रिलला हीट वेव्हचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नागपूरला सुद्धा पुढील 24 तासांत हीट वेव्हचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. विदर्भातील तापमानात चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दमट वातावरण असलेल्या भागात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तेथील नागरिकांनी सुद्धा सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.