शिक्षण बीकॉम, पण तरुणी करतेय व्यवसाय, चविष्ट चीज केकला डोंबिवलीकरांचा जोरदार प्रतिसाद, कमाईसुद्धा चांगली, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
famous cheese cake in dombivali - यामिनीचे बीकॉम मधून शिक्षण पूर्ण झालेले आहे. तिने त्यानंतर 2 वर्ष नोकरीसुद्धा केली. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय असल्यामुळे सुरुवातीला तिने जॉब करणे पसंत केले.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे - सध्या अनेकजण व्यवसायात आपले नशीब आजमावून पाहत आहेत. डोंबिवलीतही एक तरुणी मागील 4 वर्षांपासून स्वतः चीज केकचा व्यवसाय करत आहे. ही तरुणी आठवड्याचे 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार डोंबिवली स्थानकाजवळ असणाऱ्या फडके रोड येथे चीज केकचा व्यवसाय करते. तसेच इतर दिवस घरातूनच हा व्यवसाय करते. या चीज केकच्या व्यवसायातून तरुणी फक्त महिन्याचे 8 दिवस स्टॉल लावून 20 ते 25 हजार कमावते. याचबाबत लोकल18 हा आढावा.
advertisement
यामिनी खामकर असे या तरुणीचे नाव असून, माय क्रिमी क्रिएशन या नावाने ती केकचा व्यवसाय करते आहे. तिचे चीज केक डोंबिवलीमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. या चीज केकमध्ये बिसकॉफ चीज केक, ब्ल्यूबेरी चीज के, नटेला चीज केक, मोचा ट्फल, रेड वेलवेट कप केक या सगळ्या व्हरायटी मिळतात. या सगळ्या चीज केकची किंमत फक्त 150 रुपये आहे.
advertisement
कमी किमतीत अगदी उत्तम दर्जाचा चीज केक विकणारी डोंबिवली ती एकटीच तरुणी आहे. शनिवारी, रविवारी तर फडके रोडवर डोंबिवलीकर तिच्याकडे इतकी गर्दी करतात की, फक्त दीड ते दोन तासातच तिचे चीज केक संपून जातात.
advertisement
यामिनीचे बीकॉम मधून शिक्षण पूर्ण झालेले आहे. तिने त्यानंतर 2 वर्ष नोकरीसुद्धा केली. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय असल्यामुळे सुरुवातीला तिने जॉब करणे पसंत केले. परंतु नंतर तिचा कल केकच्या व्यवसायात आहे याची जाणीव घरच्यांना सुद्धा आणि तिला सुद्धा झाली आणि म्हणूनच तिने स्वतःचा हा व्यवसाय सुरू केला. तिच्या आई-वडिलांचा बहिणीचा तिच्या यशात खूप मोठा वाटा आहे.
advertisement
'कॉलेजमध्ये असल्यापासूनच मी घरगुती पद्धतीने केक बनवायची. त्यातच मला चीज केक बनवण्याची आवड लागली. नोकरी केल्यानंतर जाणवलं की, आपण यामध्ये व्यवसाय करू शकतो. म्हणूनच मी हा व्यवसाय करण्याचा ठरवलं. बाहेर मिळणाऱ्या चीज केकपेक्षा माझा चीज केक हा उत्तम दर्जाचा असायला हवा आणि कमी किमतीतला चिज केक लोकांना आवडायला हवा. हाच माझा विचार राहिला आहे,' असे यामिनी खामकर हिने सांगितले.
advertisement
तर मग अजूनही तुम्ही यामिनीच्या हातचे चीज केक डोंबिवलीत असूनही खाल्ले नसतील तर येत्या शनिवार, रविवारी नक्की तिच्या चविष्ट चीज केकची चव चाखू शकता.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 30, 2024 7:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
शिक्षण बीकॉम, पण तरुणी करतेय व्यवसाय, चविष्ट चीज केकला डोंबिवलीकरांचा जोरदार प्रतिसाद, कमाईसुद्धा चांगली, VIDEO