Diesel Theft: मागून येऊन तलवार काढायचे अन्... जालन्यात 3 परप्रांतियांना अटक
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Diesel Theft: मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जालना पोलिसांना कारवाई करून तिघांना ताब्यात घेतलं आहे.
जालना: जालना जिल्ह्यात डिझेल चोरीचं एक मोठ रॅकेट उघडकीस आलं आहे. जिल्ह्यातील काही सराईत डिझेल चोर समृद्धी महामार्गासह जालन्यातील विविध ठिकाणी रोडच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर आणि ट्रकमधून डिझेल चोरी करत होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी जालन्यातील दोन गुन्हेगार मध्यप्रदेशातील तीन जणांकडून या चोऱ्या करवून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डिझेल चोरी करणाऱ्या 3 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे तर दोघे फरार आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळेल्या माहितीनुसार, फरार असलेले दोन्ही गुन्हेगार जालन्यातील असून त्यांचा शोध घेतला जात आहे. हे गुन्हेगार सीसीटीव्हीत दिसू नये म्हणून मध्यप्रदेशातील अनोळखी आरोपींकडून गुन्हे करवून घेत होते. डिझेल विक्री केल्यानंतर त्यातील पैसे हे आरोपी मध्यप्रदेशातील आरोपींच्या फोन पे वर पाठवायचे. समीर नूर मोहम्मद मेव, हनिफ खान मुंशी खान (दोपाडा, जि. शाजापुर, राज्य मध्यप्रदेश), हुसैन खान अजिज खान (सुजानपुर, जि. शाजापुर, राज्य मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
advertisement
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील डिझेल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना अंबड रोडवरील श्री हॉटेल येथे हे चोरटे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी इतरांच्या मदतीने समृद्धी महामार्गावर ट्रक चालकाला तलवारीचा धाक दाखवून 100 लिटर डिझेल चोरी केलं आहे.
advertisement
बेधडकपणे डिझेलची चोरी
हे गुन्हेगार रोडच्या कडेला थांबलेल्या वाहनांना टारगेट करत होते. थांबलेल्या वाहनाचा ड्रायव्हर झोपलेला असल्यास डिझेल टँकचं कुलूप तोडून डिझेल काढून घ्यायचे. चालक एकटाच असेल तर त्याला तलवार अथवा इतर शस्त्रांचा धाक दाखवून डिझेलचोरी केली जात होती. या प्रकारामुळे महामार्गावर चालणारे वाहनचालक त्रस्त झाले होते.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Sep 02, 2025 9:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Diesel Theft: मागून येऊन तलवार काढायचे अन्... जालन्यात 3 परप्रांतियांना अटक






