advertisement

Accident News: समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; टायर फुटल्याने वाहन जळून खाक

Last Updated:

या अपघातात केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे टायर फुटून ट्रकला आग लागली. यानंतर हा ट्रक जळून खाक झाला

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात
समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात
राहुल खंडारे, बुलढाणा 04 ऑगस्ट : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. या महामार्गावर सतत भीषण अपघात झाल्याच्या बातम्या समोर येत राहतात. आता पुन्हा एकदा अपघाताची एक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अपघातग्रस्त ट्रक जळून खाक झाला आहे.
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. एक महिन्यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे याच समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताने 25 जणांचा बळी घेतला होता. खासगी बसच्या भीषण अपघातात 25 जण जळून खाक झाले होते. ही घटना अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी होती. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस तसेच समृद्धी महामार्ग प्राधिकरणाकडून अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
advertisement
या उपयायोजनांनंतर कुठेतरी अपघातांना आळा बसल्याचा दावाही पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे टायर फुटले. या अपघातात ट्रकला आग लागली. यानंतर हा ट्रक आगीच्या भक्षस्थानी सापडून जळून खाक झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील राजनी धानोरा गावादरम्यान हा अपघात झाला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसल्याचं समोर येत आहे.
समृद्धी महामार्गावर वाहन चालकांची डोळे तपासणी -
दरम्यान, समृद्धी महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून सातत्याने वेगवेगळे उपाय केले जात आहेत. आता नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाने यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे. समृद्धी महामार्गावरील प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चालकांची डोळे तपासणी केली जाणार आहे. आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार यांनी ही माहिती दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident News: समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; टायर फुटल्याने वाहन जळून खाक
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement