तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी

Last Updated:

नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे

तुळजाभवानी मंदिर
तुळजाभवानी मंदिर
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव : धाराशिव शारदीय नवरात्र काळात पौर्णिमेला तुळजाभवानी मातेचे मंदीर 22 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या नवरात्र काळात पूजा आणि दर्शन वेळेत बदल करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे.
13 आणि 14 ऑक्टोबर रोजी भवानी ज्योत येणार असल्याने आणि 15 ते 24 ऑक्टोबर नवरात्र उत्सव असल्याने तसेच 28 ते 30 ऑक्टोबर काळात अश्विन पौर्णिमा/असल्याने वेळेत बदल करण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिर रात्री 11 वाजता बंद होऊन पहाटे 1 वाजता चरणतीर्थ होऊन मंदीर दर्शनासाठी उघडले जाणार आहे. अभिषेक आणि पूजा सकाळी 6 ते 10, सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली आहे.
advertisement
तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे भाविकांना आता 22 तासात कधीही मातेचं दर्शन घेता येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement