Uddhav Thackeray Speech : 'आता आम्ही दोघं तु्म्हाला फेकून देऊ...', उद्धव ठाकरेंकडून राजसोबत युतीचे संकेत
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत दिले आहेत.
मुंबई: त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा होत आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत दिले आहेत.
विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्मानिय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आजच्या भाषणा पेक्षा आमच एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील 'अंतरपाट' अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी आलो आहेत, असे उद्धव यांनी म्हटले. उद्धव यांचे हे वक्तव्य म्हणजे मनसेसोबतच्या युतीचे स्पष्ट संकेत असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, भाषेवरुन जेव्हा विषय निघतो, तेव्हा वरवर धरुन चालणार नाही. या नतद्रष्टांचा आम्ही अनुभव घेतला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं असे वागतात. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करुन घेतला. अरे डोक्यावर शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होतं. कोणत्या भाषेत बोलत होतात. अगदी सगळ्यांची शाळा काढली, मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्च शिक्षित आहेत. भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता असा सवाल उद्धव यांनी भाजपला आहे.
advertisement
होय, आम्ही गुंड आहोत...
देवेंद्र फडणवीस आज जे बोलले आहेत भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर मराठी माणूस न्याय मागण्यासाठी गुंडगिरी करत असेल तर आम्ही गुंड आहोत. आहोत आम्ही गुंड, गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करूच असंही उद्धव यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी केलेली वक्तव्य आठवतात. दिल्लीत बसणाऱ्यांचे पाय चाटतो. मुंबई मराठी माणसांनी मिळवली, तेव्हाही तत्कालीन सत्ताधारी होते तेव्हा मराठी माणसाला मुंबई द्यायला तयार नव्हते. कशी मिळाली नाही, लढून आपल्या हक्काची मुंबई घेतली.
advertisement
सात पिढ्या आल्या तरी....
उद्धव यांनी म्हटले की, हिंदी, हिंदू, हिंदुस्तान यातलं हिंदी काही आम्हाला मान्य नाही. सात पिढ्या उतरल्या तरी हिंदीसक्ती करू देत नाही. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली होती. याचा मला अभिमान आहे. मराठीचे दुष्मन कोण आहेत? महाराष्ट्रात मराठी सक्ती केल्यावर काही लोक कोर्टात गेले. केडिया यांचीच सगळी पिल्लावळ आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. राज मी तुला माझ्यासोबत घेतो, कारण आता आपण एकत्रच पुढे चाललो आहोत, असेही उद्धव यांनी म्हटले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 05, 2025 1:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Speech : 'आता आम्ही दोघं तु्म्हाला फेकून देऊ...', उद्धव ठाकरेंकडून राजसोबत युतीचे संकेत