Ganeshotsav Special MEMU: कोकणातून मुंबईला परत यायचंय? काळजी सोडा, ही अनारक्षित रेल्वे ठरेल वरदान
- Published by:Vrushali Kedar
 - local18
 
Last Updated:
Ganeshotsav Special MEMU: गणेश विसर्जनानंतर कोकणात गेलेले लाखो चाकरमानी मुंबईला येण्यासाठी परतीचा प्रवास सुरू करतील.
मुंबई : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना आपल्या गावी जातं यावं, यासाठी रेल्वेने विशेष तयारी केली आहे. गणेशोत्सवासाठी यंदा 380 विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत. कोकण विभाग आणि उर्वरित महाराष्ट्रातून मध्य रेल्वेने एकूण 310 गणपती विशेष रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे फक्त कोकणात जाण्यासाठीच नव्हते तर कोकणातून परत मुंबईला येण्यासाठी देखील विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. रेल्वेने चिपळूण ते पनवेल अनारक्षित मेमू गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरांमधून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी गेले आहेत. गणपती विसर्जनानंतर मुंबईला माघारी येण्याऱ्यांची संख्या देखील तितकीच असेल. त्यामुळे रेल्वेवर मोठ्या प्रमाणात ताण येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन चिपळूण ते पनवेल अनारक्षित मेमू गाडी चालवली जाणार आहे.
advertisement
मेमूचं वेळापत्रक
गाडी क्रमांक 01160 (चिपळूण-पनवेल): ही गाडी चिपळूणहून 3 आणि 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी पनवेलला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01159 (पनवेल-चिपळूण): ही गाडी पनवेलहून 3 आणि 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी चिपळूणला पोहोचेल.
advertisement
8 डब्यांच्या या रेल्वेगाडीला अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे या रेल्वे स्टेशन्सवर थांबा असेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी विशेष ट्रेन
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-सावंतवाडी गणेशोत्सव विशेष गाडी 28 आणि 31 ऑगस्ट आणि 4 आणि 7 सप्टेंबर रोजी दोन्ही मार्गांवर धावेल. ट्रेन क्रमांक 01131 सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी एलटीटीहून निघेल आणि रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. परतीची ट्रेन क्रमांक 01132 सावंतवाडीहून रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी एलटीटीला पोहोचेल. या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली आणि सिंधुदुर्ग यांसारख्या प्रमुख स्टेशन्सवर थांबतील.
advertisement
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबा देण्यात आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 4:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganeshotsav Special MEMU: कोकणातून मुंबईला परत यायचंय? काळजी सोडा, ही अनारक्षित रेल्वे ठरेल वरदान


