Pune Ganeshotsav 2025: दगडूशेठ समोर भक्तीचा महापूर! 35 हजार स्त्रियांनी केलं अथर्वशीर्ष पठण, इटालियन अभिनेत्रीचाही समावेश

Last Updated:

Pune Ganeshotsav 2025: लाखो पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या उत्सवाला यंदा 133 वर्षे पूर्ण होत आहेत.

+
Pune

Pune Ganeshotsav 2025: दगडूशेठ समोर भक्तीचा महापूर! 35 हजार स्त्रियांनी केलं अथर्वशीर्ष पठण, इटालियन अभिनेत्रीचाही समावेश

पुणे: बुधवारी (27 ऑगस्ट) गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन झालं आहे. सध्या राज्यासह पुण्यातही गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. लाखो पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या उत्सवाला यंदा 133 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्ट आणि सुवर्णयोग तरुण मंडळाकडून गणेश उत्सव काळामध्ये अनेक सांस्कृतिक पारंपारिक आणि भक्तीपर कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आलं आहे. आज (28 ऑगस्ट) ऋषिपंचमी निमित्त गणपती उत्सव मंडपासमोर एकाचवेळी 35000 महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं.
गणपती उत्सव मंडपासमोर सकाळीच हजारो महिला पारंपरिक वेशभूषा करून आल्या होत्या. त्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं. त्यानंतर गणरायाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम अनुभवण्यासाठी इतर भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
advertisement
परदेशी अभिनेत्रीची उपस्थिती 
पुणे शहराचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगात ख्याती आहे. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आणि अथर्वशीर्ष पठण सोहळ्याला इटलीची अभिनेत्री अॅना माराने देखील उपस्थिती दर्शवत सहभाग नोंदवला.
देखाव्याने पाडली भाविकांना भूरळ
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आपल्या आकर्षक देखाव्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. यावर्षी ट्रस्टने केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारून भाविकांसाठी अनोखा नजारा निर्माण केला आहे. पद्मनाभस्वामी मंदिर हे केरळ राज्याच्या तिरुअनंतपुरम येथे आहे. हे भगवान विष्णूंना समर्पित असलेलं अतिशय प्राचीन मंदिर आहे. याच मंदिराची तेजस्वी झलक यंदा पुण्यातील गणेशोत्सवात पाहायला मिळणार आहे. मंडपाची रचना अशी केली आहे की, भाविकांना लांबूनही बाप्पाचे दर्शन घेणं सहज शक्य होईल. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि अंतर्गत भागात आकर्षक विद्युत सजावटही केली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ही प्रतिकृती आणखीन देखणी भासते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Ganeshotsav 2025: दगडूशेठ समोर भक्तीचा महापूर! 35 हजार स्त्रियांनी केलं अथर्वशीर्ष पठण, इटालियन अभिनेत्रीचाही समावेश
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement