संभाजीनगर: डोळ्यात मिरची, कटरने वार, 27 लाख लूट प्रकरणाला भयंकर वळण, चालकच निघाला मास्टरमाइंड

Last Updated:

Crime in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागात डोळ्यात मिरची पूड फेकून आणि कटरने वार करून भरदिवसा २७ लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावली होती.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं डोळ्यात मिरची पूड फेकून, कटरने वार करून भरदिवसा २७ लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावली होती. आता या घटनेला वेगळं वळण लागलं आहे. घटनेमागील सत्य केवळ १२ तासांत पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. विशेष म्हणजे, ज्या चालकाच्या हातून ही बॅग हिसकावली गेली, तोच चालकच या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड असल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गणेश ओंकारराव शिंदे आणि त्याचा मुलगा अमोल गणेश शिंदे या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २७ लाखांपैकी तब्बल २५ लाख २ हजार ४८० रुपये जप्त करण्यात आले आहेत.

नेमका काय होता प्रकार?

उस्मानपुरा भागात दोन दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या लूटमारीची एक धक्कादायक घटना घडली होती. एका व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पूड फेकून कटरने वार करून त्याच्याकडील २७ लाख रुपयांची बॅग हिसकावून चोरटे पसार झाले होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.
advertisement

चालकानेच आखला कट

मात्र, घटनेच्या १२ तासांत उस्मानपुरा पोलिसांनी तपास चक्रे फिरवत या प्रकरणाचा छडा लावला. ज्या चालक गणेश ओंकारराव शिंदे यांच्या हातातील बॅग लुटली गेली होती, त्यांनीच हा सर्व बनाव रचल्याचे उघड झाले. गणेश शिंदे हे मागील १८ वर्षांपासून त्यांच्या मालकाच्या कंपनीत चालक म्हणून नोकरी करत होते. मात्र, ते मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाले होते. तसेच, लवकरच त्यांना नोकरी सोडायची असल्याने, 'जाण्यापूर्वी अखेरचा हात मारावा' या उद्देशाने त्यांनी ही रक्कम लुटण्याचा कट आखला.
advertisement
या कटात त्यांनी आपला मुलगा अमोल गणेश शिंदे याला सामील केले. बाप-लेकाने मिळून ही रक्कम लुटण्याचा आणि 'लूट झाल्याचा' बनाव करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास करून या बाप-लेकांना अटक केली. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून लुटलेली बहुतांश रक्कम जप्त केली असून पुढील तपास उस्मानपुरा पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगर: डोळ्यात मिरची, कटरने वार, 27 लाख लूट प्रकरणाला भयंकर वळण, चालकच निघाला मास्टरमाइंड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement