advertisement

वंचितच्या महिला कार्यकर्तीने बिल्डर रहेजाचं ऑफिस फोडलं, तरुणाला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरण

Last Updated:

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुशील रहेजाचे ऑफिस फोडले. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

वंचितने रहेजा बिल्डरचं ऑफिस फोडलं
वंचितने रहेजा बिल्डरचं ऑफिस फोडलं
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील सुशील रहेजा बिल्डरने त्याच्याकडे कामास असलेल्या राहुल जाधव या बौद्ध तरुणास क्षुल्लक कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केली होती. ऑफिसमध्ये सर्व स्टाफसमोर त्याला मारहाण केली होती. यावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला होता. रहेजा बिल्डर विरोधात मुंबईतील गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीसुद्धा आरोपी रहेजा बिल्डरला पोलिसांनी अटक केली नाहीये.
आज सुशील रहेजा त्याच्या चेंबूर येथील ऑफिसमध्ये असल्याचे समजल्यावर वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी, वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर गवई यांनी ऑफिसच्या दिशेने कूच केले. मात्र वंचितचे पदाधिकारी येत असल्याचे कळताच रहेजाने ऑफिसमधून पळ काढला. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुशील रहेजाचे ऑफिस फोडले. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
advertisement
पीडित तरुण राहुल जाधव हा बिल्डर सुशील रहेजाकडे कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी कागदपत्रे (पेपर) नीट स्टेपल न केल्याचा राग मनात धरून रहेजा यांनी राहुलला मारहाण केली. केवळ इतक्यावरच न थांबता, “तुम घाटी, लोग कभी सुधरेगा नही” असे वादग्रस्त शब्द वापरून त्याचा अपमान केला आणि स्टाफ समोरच मारहाण केली होती. यावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
advertisement

मनसेकडूनही बिल्डरचा निषेध

तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत… मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा कडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ… भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची … केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे… आता पाहूया आशिष शेलार, साटम आणि फडणवीसांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो … मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डर कडून मराठी तरुणाला मारहाण… या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत …!!! बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच…!!! असे ट्विट मनसे नेते गजानन काळे यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वंचितच्या महिला कार्यकर्तीने बिल्डर रहेजाचं ऑफिस फोडलं, तरुणाला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरण
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement