advertisement

अशोक खरातकडून सत्कार का करून घेतला? बच्चू कडूंचं 'त्या' व्हिडीओवर स्पष्टीकरण, भाजपवर थेट आरोप

Last Updated:

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले. या व्हिडीओमध्ये अशोक खरातने बच्चू कडू यांचा सत्कार केला होता

News18
News18
नाशिक : कांदा आणि मक्याच्या दरासाठी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी नाशिकमधील प्रांत कार्यालयावर जोरदार आंदोलन केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बच्चू कडू यांचे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले. या व्हिडीओमध्ये अशोक खरातने बच्चू कडू यांचा सत्कार केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
बलात्कार प्रकरणाला हैवान अशोक खरात याच्यासोबत फोटो असल्यामुळे रुपाली चाकणकर याांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिवसेना, भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो हे अशोक खरातसोबत असल्याचे समोर आले. त्यानंतर आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर बच्चू कडू यांनी खुलासा केला आहे.
advertisement
"भोंदू बाबाचा आम्ही निषेध करतो आम्हाला कार्यकर्त्यांनी महादेवाच्या मंदिरात नेलं त्या ठिकाणी ते भोंदू बाबा होते, त्यांनी त्या ठिकाणी माझा सत्कार केला, ते माझ्यापेक्षा मोठी असल्याने संस्कृती प्रमाणे मी त्यांच्या पाया पडलो.  आम्हाला माहित असते की हा महाराज कामाचा नाही. पण समाज मन जपण्यासाठी आम्ही जातो, मात्र आम्ही त्याचा निषेध करतो' असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिली.
advertisement
तसंच,  त्या अशोक खरातकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा गेले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विखे पाटील सुद्धा तिथे गेले पण तुम्ही मी त्यांना विचारलं का? कोणत्या सीड्या बाहेर काढायच्या हे भाजपने ठरवलं आहे, इतर लोक गेले पण त्यांना विचारलं नाही. बच्चू कडू गरीब आहे म्हणून तुम्ही विचारत आहे, बच्चू कडूंना बदनाम करण्याचा अजेंडा भाजप कार्यालयाकडून आला आहे, असा आरोपच बच्चू कडू यांनी केली.
advertisement
भाजपचे मोठे नेते आसाराम बापूला भेटले होते मग...
तसंच,  त्या भोंदू बाबांनी जे सांगितलं त्यांचं पूर्ण निदान चुकीचं निघालं, मी त्यावेळेस उद्धव ठाकरें यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो.  खरात सोबतची माझी भेट अपघाती झाली, कार्यकर्त्यांसोबत मी गेलो, त्या ठिकाणी माझा सत्कार झाला ती माझी चूक नाही, पण ते व्हिडिओ काढून मला बदनाम करण्याचं काम भाजपची टीम करत आहे.  आसाराम बापूच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा गेले, भाजपचे मोठे चार नेते आसाराम बापू सोबत सुद्धा आहे, मग त्यांचा राजीनामा घ्यावा लागणार नाही का? असा परखड सवाल तरत,  ते झाकून ठेवायचं आणि इतर लोकांचा राजीनामा घ्यायचा, कोणासोबत कोणाचा फोटो असला म्हणजे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकणं चुकीचा आहे, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशोक खरातकडून सत्कार का करून घेतला? बच्चू कडूंचं 'त्या' व्हिडीओवर स्पष्टीकरण, भाजपवर थेट आरोप
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement