आव्हाडांना पाडण्यासाठी दादांचा '200 कोटी'चा प्लान, मुंब्र्यात सगळाच हिशोब मांडला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी अजित पवारांनी पूर्ण प्लान केला आहे.
अजित मांढरे, प्रतिनिधी
मुंब्रा : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी अजित पवारांनी पूर्ण प्लान केला आहे. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी अजित पवार आले होते. मुंब्रा कळवा मतदारसंघासाठी मागच्या 3 महिन्यांमध्ये 200 कोटीचा निधी दिला आहे, पुढच्या 5 वर्षात 3 हजार कोटींचा निधी देऊ, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.
advertisement
काय म्हणाले अजित पवार?
'माझ्या पक्षाने 10 टक्के तिकीट अल्पसंख्याकांना दिली आहेत. आमची विचारधारा शाहू, फुले, आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांची आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चांगले संबंध ठेवून चाललं पाहिजे. अल्पसंख्याकांसाठी लोकहितकारी कामं केली आहेत. अल्पसंख्याक समाजाच्या गरजा ओळखून पूर्ण केल्या जातील. समाजाला आरक्षणाकरता अभ्यास सुरू आहे. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक विकासाकरता आम्ही योजना आणल्या आहेत, मार्टीची स्थापना केली आहे', असं अजित पवारांनी सांगितलं.
advertisement
'आधीच्यांनी अल्पसंख्याकांचा कधीच विचार केला नाही. महायुतीत काम करण्याचं निश्चित केलं तेव्हा अल्पसंख्याक समाजाकरता काम करणार हे स्पष्ट केलं होतं. काँग्रेससोबत मी काम केलंय. त्यांना फक्त तुमची मतं पाहिजेत. तुमच्यासाठी काम करयाचं नाही. मी मुंब्रावासियांना शब्द देतो, मी एकदा शब्द दिला की निभावतो. मी टोरेंट हटवणार, सीएसआरचा निधीही देणार. ड्रग फ्री मुंब्रा करणार. नजीब मुल्लाला जिंकून द्या, मी ही कामं करतो. अतिरिक्त पाणीही देऊ. मी 3 महिन्यात मुंब्र्याकरता 200 कोटी रुपये निधी दिला. 15 वर्ष एकाला संधी दिली, आता नजीबला संधी द्या, नजीब मुल्लाला निवडून द्या, 5 वर्षात 3 हजार कोटीचा निधी देतो', असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.
advertisement
'पहिल्या आमदाराचं 15 वर्षांचं काम आणि नजीब मुल्लाचं 5 वर्षांचं काम सगळे बघतील, कुणी घाबरू नका, मी आहे. 23 तारखेला जल्लोष आमचाच असेल', असं अजित पवार म्हणाले आहेत.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Nov 15, 2024 8:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आव्हाडांना पाडण्यासाठी दादांचा '200 कोटी'चा प्लान, मुंब्र्यात सगळाच हिशोब मांडला!










