advertisement

Iran US Conflict: इराणच्या हल्ल्याचा धसका, आखातामधील 'या' देशाकडून अमेरिकेला नो एन्ट्री, युद्धात मोठी घडामोड

Last Updated:

Iran War: इराणने आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार हल्ले केले. अमेरिकेचे रडार, लष्करी तळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.

इराणच्या हल्ल्याचा धसका, आखातामधील 'या' देशाकडून अमेरिकेला नो एन्ट्री, युद्धात मोठी घडामोड (AI Image)
इराणच्या हल्ल्याचा धसका, आखातामधील 'या' देशाकडून अमेरिकेला नो एन्ट्री, युद्धात मोठी घडामोड (AI Image)
तेहरान:अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात यु्द्ध सुरू करून २१ दिवस झाले. इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्याला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणने आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार हल्ले केले. अमेरिकेचे रडार, लष्करी तळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. अमेरिकेच्या तळांमुळे आपल्या देशात इराणच्या मिसाईल येत असल्यानं आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच आता इराणच्या धास्तीने आखातात मोठी घडामोड झाली आहे.
मध्यपूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक होत चालली आहे. इराकने आपल्या भूमीवर अमेरिकेला लष्करी तळ (Military Base) देण्यास स्पष्ट नकार दिला आहे, तर दुसरीकडे इराणने ब्रिटनला थेट परिणामांचा इशारा देत युद्धाची ठिणगी टाकली आहे.

इराकचा अमेरिकेला 'नो एन्ट्री'चा बोर्ड

इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांशी चर्चा करताना ठामपणे सांगितले की, अमेरिकन सैन्याला इराकचे लष्करी तळ वापरू देणे हे देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन ठरेल. "आमच्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी इराकी सैन्य स्वतः सांभाळण्यास समर्थ आहे, त्यामुळे परदेशी सैन्याच्या उपस्थितीची गरज नाही," असे सुदानी यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, अशा कोणत्याही निर्णयासाठी इराकी संसदेची मंजुरी अनिवार्य असेल, असेही सरकारने म्हटले आहे.
advertisement

इराणचा ब्रिटनला इशारा....

दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री यवेट कूपर यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. "जर ब्रिटनने आपले लष्करी तळ अमेरिकेला इराणविरुद्ध वापरू दिले, तर ती इराणवर केलेली थेट कारवाई मानली जाईल," असा इशारा अराघची यांनी दिला. इराणने स्पष्ट केले आहे की, स्वतःच्या संरक्षणासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि गरज पडल्यास अशा लष्करी तळांना लक्ष्य करण्यासही मागे-पुढे पाहणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran US Conflict: इराणच्या हल्ल्याचा धसका, आखातामधील 'या' देशाकडून अमेरिकेला नो एन्ट्री, युद्धात मोठी घडामोड
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement