'मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील राधा', कानाजवळ पुटपुटायचा, महिलांचे शोषण कॅप्टन कसा करायचा? मोडस ऑपरेंडी समोर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
कॅप्टन खरातकडे अनेक राजकीय नेते, चित्रपट सृष्टीतील कलाकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील बड्या मंडळींचा राबता असायचा, असे तेथील स्थानिक सांगतात. पोलिसांनी केलेल्या चौकशीत खरात याच्याकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाची विशिष्ट पद्धती समोर आली आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक : शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. विशेष पोलीस पथकाच्या प्रमुख म्हणून आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी नाशकात जाऊन भोंदूबाबा कॅप्टन खरात याची गुरूवारी तब्बल दोन तास कसून चौकशी केली. या चौकशीत कॅप्टन खरात महिलांचे लैंगिक शोषण कसे करायचा? याची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे.
महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात कॅप्टन अशोक खरात नाशिक पोलिसांच्या अटकेत आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. १०० हून अधिक महिलांच्या लैंगिक शोषणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाताला लागल्याची माहिती समजते आहे. कॅप्टन खरातकडे अनेक राजकीय नेते, चित्रपट सृष्टीतील कलाकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील बड्या मंडळींचा राबता असायचा, असे तेथील स्थानिक सांगतात. पोलिसांनी केलेल्या चौकशीत खरात याच्याकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाची विशिष्ट पद्धती समोर आली आहे.
advertisement
महिलांच्या कानात सांगायचा, 'मी कृष्ण-तू माझी राधा'
मी कृष्णाचा अवतार आहे. तू मागच्या जन्मातील माझी राधा आहे, असे सांगून महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन कॅप्टन खरात त्यांच्या कानाजवळ पुटपुटायचा. त्यापूर्वी पेढा आणि कडवट -खारट चव असलेले पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्री म्हणायला लावायचा आणि लागलीच त्यांना अंगाला स्पर्श करायला सुरुवात करायचा. महत्त्वाचे म्हणजे महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली त्याच्या दालनाबाहेर बसवून ठेवायचा.
advertisement
महिलांना गुंगी आली की त्यांचे लैंगिक शोषण करीत असे. कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा हा पॅटर्न होता. कधीकधी संमतीने तर कधी जबरदस्तीने तो महिलांवर अत्याचार करीत असे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्याची काळी कृत्ये सुरू असल्याची माहिती आहे.
कॅप्टनच्या कारनाम्यावर सातपुतेंची पोलिसांसोबत तब्बल चार तास बैठक
तब्बल ४ तासापासून नाशकात विशेष पोलीस पथकाची तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात बैठक सुरू आहे. सातपुते यांनी खरातची गुरुवारी दोन तास चौकशी केली होती. सलग ४ तासांपासून SIT च्या बैठकीत कॅप्टन खरात याच्या कारनाम्यावर चर्चा सुरू आहे. वावी, शिर्डी, आणि सरकारवाडा पोलिसांत दाखल गुन्ह्यांचा SIT कडून तपास सुरू आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 3:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील राधा', कानाजवळ पुटपुटायचा, महिलांचे शोषण कॅप्टन कसा करायचा? मोडस ऑपरेंडी समोर










