Walmik Karad : वाल्मिक कराडचे ग्रह फिरले! CID नंतर आता ईडीच्या रडारवर? 'आका'चा पाय आणखी खोलात ?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वाल्मिक कराडकडे 1500 कोटीची संपत्ती असल्याचा आरोप सूरेश धस यांनी केला.तसेच ही संपत्ती त्याने खंडणी आणि काळ्या पैशातून जमा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. तसेच त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर कुठे कुठे प्रॉपर्टी आहेत.
ED sent Notice to Walmik Karad: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला सीआयडी कोठडी मिळाली आहे.या कोठडीनंतर कराडच्या चौकशीला वेग आला आहे. असे असतानाच आता कराडच्या भोवतीचा फार्स आणखीण आवळला जाणार आहेत. कारण सीआयडीनंतर आता वाल्मिक कराड ईडीच्या रडावर येणार आहे. त्यांच्याकडे 1500 कोटीची संपत्ती असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
भाजप आमदार सुरेश धस झी 24 तासच्या एका मुलाखतीत बोलत होते.या मुलाखतीत बोलताना वाल्मिक कराडकडे 1500 कोटीची संपत्ती असल्याचा आरोप सूरेश धस यांनी केला.तसेच ही संपत्ती त्याने खंडणी आणि काळ्या पैशातून जमा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. तसेच त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर कुठे कुठे प्रॉपर्टी आहेत. आता या गावांची नावं आणि माझ्याकडे यायला लागलीत आहेत.हे सगळे सातबारा आणि नाव घेऊन एखाद्या आंदोलनात मी बोलेन,असे देखील धसांनी सांगितले.
advertisement
सुरेश धस पुढे म्हणाले, मी म्हणालो होतो याच्याविरोधात चौकशी लावावी. पण मला आता माहिती मिळाली की ईडीची नोटीस वाल्मिक कराडला मिळालेली आहे. दोन-चार महिन्यापूर्वी त्यांनी ही नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे.त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या मागे ईडीचा ससेमिरा लागणार आहे.
एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आले ज्याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली.
पत्रात लिहिले आहे की समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाइन ची दुकाने आहेत. प्रत्येक वाइन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका आहे.
ही जमीन केज येथे १,६९,००,००० २९/११/२४… pic.twitter.com/kZqVoS1BTe
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 7, 2025
advertisement
अंजली दमानीयांचा लेटर बॉम्ब
एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आले ज्याची माहिती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.या
पत्रात लिहिले आहे की समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाइनची दुकाने आहेत. प्रत्येक वाइन दुकानाचा बाजार भाव 5 कोटी इतका आहे. ही जमीन केज येथे १,६९,००,००० २९/११/२४ ला घेतली आणि ३ दिवसात परवानगी दिली गेली. सात बारा १५ दिवसानंतर होतो पण सगळे कायदे कसे धाब्यावर लावण्यात येतात याचे उदाहरण आहे, असा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2025 11:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad : वाल्मिक कराडचे ग्रह फिरले! CID नंतर आता ईडीच्या रडारवर? 'आका'चा पाय आणखी खोलात ?


