Walmik Karad Surrender : वाल्मिक कराडच्या सरेंडरवर संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला हत्येत सहभाग...
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वाल्मिक कराडच्या या आत्मसमर्पणानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता या आत्मसमर्पणावर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Walmik Karad Surrender : रवी जैस्वाल, जालना : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराडने सरेंडर केलं आहे. पुण्याच्या सीआयडी ऑफिसमध्ये येऊन त्यांनी आत्मसमर्पण केलं. वाल्मिक कराडच्या या आत्मसमर्पणानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता या आत्मसमर्पणावर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
वाल्किम कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, वाल्मिक कराडनंतर आता इतरही आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच संतोष देशमुख हत्येत सहभाग नव्हता तर इतके दिवस समोर का आला नाही,असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा असं धनंजय देशमुख यांनी मागणी केली आहे.
advertisement
वाल्मिक कराडच्या सरेंडरवर संशय
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत वाल्मिक कराडच्या सरेंडरवर बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, जर वाल्मिक कराडवर 11 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल झाला. मह त्याचं दिवशी शरण यायचं ना, मग बाहेर पळून कशाला गेले? शरण येण्यासाठी 23 ते 24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? असा संशय व्यक्त केला आहे.
advertisement
संतोष देशमुख प्रकरणात राजकीय द्वेषापोटी माझे नाव जोडले गेल्याचे वाल्मिक कराडने व्हिडिओ संदेशात म्हटलं होतं.यावर बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, राजकीय द्वेष कोणाचा हे सगळ उघड्या डोळ्याने बघतोय, राज्यात तीन पक्षाचे आमदार बोलतायत, मी एकटा थोडी बोलतोय. भाजपचे दोन आमदार बोलतायत अजित पवारांचे तीन आमदार बोलतायत,असे सोनवणे यांनी सांगितले.
तसेच हे तीन गुन्हे क्लब केले आहेत. या तीनही गुन्ह्यांचा एकमेकांशी संबंध नाही तर हे गुन्हे क्लब का केले? मर्डर केस, खंडणीचा गुन्हा सीआयडीकडे केला. अॅट्रॉसीटीचा गु्न्हा सीआयडीकडे केला. त्यामुळे हे तीनही गुन्हे सीआयडीकडे दिले याचा अर्थ या गुन्ह्यांचा काही ना काही एकमेंकांशी संबंध आहेत. त्यामुळे तपासातून दुध का दुध पाणी होईल, असे बजरंग सोनवणे यांनी सांगितले आहे.
advertisement
कराडच्या 'त्या' व्हिडिओत नेमकं काय?
सीआयडीला शरण जाण्यापुर्वी वाल्मिक कराडने एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओत वाल्मिक कराड केज पोलिस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्यामुळे मला अटकपुर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाशाण रोड येथे सरेंडर होत, अशी त्यांनी सूरूवातीला माहिती दिली. त्यानंतर संतोष भैय्या देशमुख यांच्या जे कुणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची मागणी द्यावी,अशी कराड यांनी मागणी केली. आणि राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जातं आहे. तरी पोलीस तपासात मी दर दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे शेवटी वाल्मिक कराडने सांगितले.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
December 31, 2024 2:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad Surrender : वाल्मिक कराडच्या सरेंडरवर संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला हत्येत सहभाग...


