शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कापसाची विक्रमी भावात विक्री, दर चांगला मिळत असल्यानं आवकही वाढली
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वर्धा, 21 नोव्हेंबर, नरेंद्र मते : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कापूस विक्रीला सुरुवात झाली आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट बाजार समितीत कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. दर चांगला मिळत असल्यानं बाजार समितीत कापसाची आवक देखील वाढली आहे. हिंगणघाट बाजार समितीचा विर्दभातील प्रमुख बाजार समितीमध्ये समावेश होतो.
वर्ध्यातल्या हिंगणघाटची बाजार समिती विदर्भातील मोठी बाजार समिती आहे. त्यामुळे या बाजार समितीत लगतच्या अनेक जिल्ह्यातील शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी घेऊन येतात. सध्या कापसाला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. कापसाला चांगला दर मिळत असल्यानं कापसाची आवक देखील वाढली आहे.
advertisement
यंदा चांगला दर मिळण्याची शक्यता
दरम्यान यंदा कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा कापसाच्या उत्पन्नात घट झालीये. कापसाची आवक कमी झाल्यास कापसाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी राज्यात पावसाचं प्रमाण असमान राहिलं, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर काही ठिकाणी पुरेसा पाऊसच पडला नाही. विदर्भात कापसाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला तर मराठवाड्यात पुरेसा पाऊस न पडल्यानं कापसाचं उत्पादनात घट झाली आहे.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
Nov 21, 2023 8:39 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कापसाची विक्रमी भावात विक्री, दर चांगला मिळत असल्यानं आवकही वाढली










