तृणधान्यापासून बनल्या एक ना अनेक आरोग्य गुणकारी पाककृती; वर्ध्यात रंगली अनोखी स्पर्धा Video
- Published by:News18 Marathi
 
Last Updated:
यामध्ये तृणधान्यापासून बनलेले एक ना अनेक हेल्दी पदार्थ बघायला मिळाले.
वर्धा, 17 ऑक्टोबर : सध्याच्या बदलत्या जीवनपद्धती आणि फास्ट फूडच्या काळात मानवाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम पडताना दिसतोय. त्याच बरोबर या काळात हेल्दी तृणधान्य पिकाचं आहारात महत्त्वही कमी दिसतं. नवी पिढी तृणधान्याचं महत्त्वही जाणत नाही. मात्र तृणधान्य हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. त्याचा आहारात समावेश व्हावा म्हणून त्याच्या वेगवेगळ्या पदार्थांची स्पर्धाच वर्ध्यात भरवण्यात आली होती. यामध्ये शाळेत आहार शिजवणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये  तृणधान्यापासून बनलेले एक ना अनेक हेल्दी पदार्थ बघायला मिळाले.
या पदार्थांमध्ये रंगली स्पर्धा
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत वर्धा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन शिक्षण विभाग पंचायत समिती वर्धा यांच्यावतीने करण्यात आलं होतं. वर्धाच्या रत्नीबाई शाळेमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये तृणधान्याचे कटलेट, वड्या, पकोडे, वडे, थालीपीठ, पराठा, सूप, भाकरी, भाजी, उसळ, खिचडी, लहान मुलांसाठीची तांदळाची आंबील, तृणधान्यापासून बनलेले लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ले जाणारे अप्पे महिलांनी बनवून आणले होते.
advertisement
जिलेबीसोबत रबडी नाही, दही मिळतं! वर्षानुवर्षे आहे खवय्यांची पहिली पसंत
याचबरोबर इडली, चिवडा, सॅलेड, ढोकळा, शेव ,लाडू ,अशा प्रकारचे आकर्षक दिसणारे आणि आरोग्यदायी असे पदार्थही पाहिला मिळाले. कमी वेळेत आणि कमी इंधनाचा वापर करून शाळेत आहार शिजवणाऱ्या महिलांनी हे सर्व पदार्थ बनवून स्पर्धेत सहभाग नोंदवला. फास्ट फूड खाण्यापेक्षा सर्वांनी आहारात तृणधान्यांचा समावेश करावा आणि आपले आरोग्य जपावे हा एक प्रयत्न होता. परीक्षकांनी परीक्षण करून उत्कृष्ट पदार्थांना क्रमांक दिले.
advertisement
तृणधान्याचे आहारातील महत्त्व दिले पटवून
view commentsया स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय हेल्दी आणि चविष्ट पदार्थ बघायला मिळाले. चिमुकल्यांच्या सुदृढतेसाठी तृणधान्यमध्ये असलेले पोषक घटक खूप महत्त्वाचे ठरतात. तृणधान्यांमध्ये जवळजवळ सर्व प्रकारचे जीवनसत्वे तसेच कर्बोदके,तृणधान्यमध्ये खनिज पदार्थ कॅल्शियम, फॉस्फरस, लोह यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे चिमुकल्यापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी तृणधान्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून आहारात समावेश करणे महत्त्वाचे ठरते ,असे परीक्षक रेणुका रपाटे यांनी सांगितले.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
October 17, 2023 6:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
तृणधान्यापासून बनल्या एक ना अनेक आरोग्य गुणकारी पाककृती; वर्ध्यात रंगली अनोखी स्पर्धा Video

              