शेतरस्ता देण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला नायब तहसीलदारांचा अजब सल्ला, शेतकरी संतापले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील केनवड शिवारात गुलाबराव दांडगे या शेतकऱ्याची शेती असून मागील वर्ष भरापासून त्यांच्या शेतात जाण्यासाठीचा रस्ता अडवण्यात आला आहे.
किशोर गोमाशे, प्रतिनिधी, वाशिम: वाशिमच्या केनवड शिवारातील शेतात जाण्यासाठी शेत रस्ता खुला करून देण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचा अजब सल्ला देणाऱ्या रिसोड तहसीलचे नायब तहसीलदार कुळमेथे यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या अधिकाऱ्याच्या बेजबदार वक्तव्याबद्दल शेतकऱ्यांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे.
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील केनवड शिवारात गुलाबराव दांडगे या शेतकऱ्याची शेती असून मागील वर्ष भरापासून त्यांच्या शेतात जाण्यासाठीचा रस्ता अडवण्यात आला आहे. यामुळे या शेतकऱ्याला त्याच्या शेतातील मशागतीचे कामे, पिक काढून आणणे यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हा रस्ता खुला करावा यासाठी गुलाबराव दांडगे यांचा मुलगा योगेश दांडगे यांनी रिसोड तहसलीदार यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते. त्यासाठी रिसोडचे नायब तहसीलदार कुळमेथे यांनी शेत शिवारात येऊन पंचनामा सुरू केला असता गुलाबराव दांडगे यांचा मुलगा योगेश दांडगे यांनी "साहेब आमच्यावर न्याय करत हा शेत रस्ता खुला करून द्या अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही" असं म्हटल्यावर नायब तहसीलदार कुळमेथे यांनी योगेश दांडगे यांना आत्महत्या करण्याचा सल्ला दिला.
advertisement
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल होत असून जबाबदार अधिकाऱ्याने असे वक्तव्य केल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप दिसत असून या अधिकाऱ्यावर कारवाई करून शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी होत आहे.
Location :
Washim,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 9:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेतरस्ता देण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला नायब तहसीलदारांचा अजब सल्ला, शेतकरी संतापले









