Weather Update : मुंबईत आजपासून दोन दिवस ढगाळ वातावरण; 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

Last Updated:

IMD Weather Update: देशासह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. दरम्यान मुंबईत पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे. तर देशातील काही राज्यांत पावसाचा इशाराही देण्यात आलाय.

हवामान अपडेट्स
हवामान अपडेट्स
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशभरातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताय. अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडलीये. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतातील हवामानात पुन्हा एकदा बदल झालाय. डोंगराळ भागांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होत असल्याने वातावरणात विचित्र बदल पाहायला मिळताय. भारतीय हवामाना विभागाच्या मते उत्तर भारतातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईतमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.
मुंबईतील वातावरण कसं राहणार?
मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातील वातावरणार सातत्याने बदल होत आहे. उपनगरातील किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलंय. हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान 19 ते 21 अंश सेल्सिअस दरम्यान राहिलेय. कमाल तापमान अजूनही 31 ते 32 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यानच आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 आणि 18 डिसेंबर रोजी रात्रीचे तापमान 21 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. त्यानंतर पुढील दोन दिवसांत ते पुन्हा 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल.
advertisement
राज्यातील वातावरण कसं असणार
राज्यातील वातावरणातही मोठे बदल होताय. संपूर्ण राज्य हे थंडीने गारठलं आहे. दरम्यान दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारा येत असल्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल होईल. राज्यातील काही भागांमध्ये थंडी असणार आहे. तर मुंबईसह काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र पुढच्या दोन दिवसांमध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये किमान तापमानात वाढ होऊ शकते असा अंदाज आहे.
advertisement
देशातील या भागांत पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत उत्तर भारतातील अनेक भागात किमान तापमान 5 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे. IMD च्या मते, जम्मू आणि काश्मीरला लागून असलेल्या उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्सची स्थिती अजूनही कायम आहे. गेल्या 24 तासांत येथे पाऊस आणि हिमवृष्टीही झालीये. त्यामुळे हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात थंडी झपाट्याने वाढतेय. यासोबतच, पूर्वांचल आणि बिहारच्या अनेक भागात किमान तापमानात सातत्याने घट होतेय. तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. स्कायमेट वेदरच्या रिपोर्टनुसार, 18 डिसेंबरला दक्षिणी तमिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. उर्वरित तामिळनाडू आणि किनारी कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update : मुंबईत आजपासून दोन दिवस ढगाळ वातावरण; 'या' ठिकाणी पावसाची शक्यता
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement