Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल कुठे स्वस्त तर कुठे महाग? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर

Last Updated:

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. देशातील तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

पेट्रोल डिझेलच्या किंमती
पेट्रोल डिझेलच्या किंमती
मुंबई, 18 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. सोमवारी सकाळी ६ वाजता WTI क्रूड ७२.१ डॉलर प्रति बॅरल दराने विक्री होत आहे. तर बेंट क्रूड ७७.२९ ड़ॉलर प्रति बॅरल झाले आहे. देशातील तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. मध्य प्रदेशात पेट्रोल ३८ पैसे तर डिझेल ३४ पैशांनी स्वस्त झालंय. छत्तीसगढमध्येही पेट्रोल-डिझेल ५० पैशांनी स्वस्त झाले.
हिमाचल प्रदेशात पेट्रोलच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. याशिवाय राजस्थान, तेलंगना, उत्तर प्रदेशात किंमती घसरल्या आहेत. याऊलट झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २२ पैशांची वाढ झालीय. गुजरात, पंजाब, तामिळनाडु, पश्चिम बंगामध्येही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसतेय.
advertisement
चार महानगरांमध्ये पेट्रोल - डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 90.08 रुपये प्रति लीटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर
चेन्नईत पेट्रोल 102.77 रुपये तर डिझेल 94.37 रुपये प्रति लीटर
दररोज सकाळी ६ वाजता नवे दर
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट इत्यादी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळे पेट्रोल, डिझेल एवढ्या महागात खरेदी करावे लागते.
advertisement
एसएमएसवर पाहू शकता दर
पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी ९२२४९९२२४९ या क्रमांकावर RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून पाठवावा. तर बीपीसीएल ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून ९२२३११२२२२ या क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड टाइप करून आणि ९२२२२०११२२ या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल कुठे स्वस्त तर कुठे महाग? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement