Maharashtra CM : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; भाजप नेत्याने नाव फोडलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस झाले आहेत. महायुतीला निवडणुकीत दणदणीत यश मिळालं, तरीही अजून मुख्यमंत्र्याचा शपथविधी झालेला नाही, त्यामुळे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस झाले आहेत. महायुतीला निवडणुकीत दणदणीत यश मिळालं, तरीही अजून मुख्यमंत्र्याचा शपथविधी झालेला नाही, त्यामुळे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे, त्यातच आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा दावा केला आहे. या नेत्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्र्याचं नावच सांगितलं आहे. पक्षाचा गटनेता ठरवण्यासाठीची बैठक 2 किंवा 3 सप्टेंबरला होईल, असंही या नेत्याने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील, असं भाजपच्या वरिष्ठ नेत्याने पीटीआयसोबत बोलताना सांगितलं आहे. दुसरीकडे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही मुख्यमंत्रिपदाचं नाव निश्चित झालं असून भाजपचे वरिष्ठ नेते यावर शिक्कामोर्तब करतील, असं स्पष्ट केलं होतं. 'पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही वरिष्ठांनी या नावावर शिक्कामोर्तब करण्याची वाट पाहत आहोत', असं रावसाहेब दानवे म्हणाले होते.
advertisement
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार?
दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपचे ज्येष्ठ नेते घेतील, असं रविवारी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. सरकार स्थापनेबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचंही शिंदे म्हणाले. शिवसेनेला गृहमंत्रीपद आणि श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? या प्रश्नावर महायुतीचे तीनही पक्ष मिळून निर्णय घेतील, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.
advertisement
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला, पण एका आठवड्यानंतरही त्यांना सरकार बनवता आलेलं नाही. निवडणुकीत एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या, तरीही भाजप सावध पावलं टाकत आहे. याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 5 डिसेंबरला संध्याकाळी आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी होईल, या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहतील, अशी माहिती दिली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2024 11:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra CM : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; भाजप नेत्याने नाव फोडलं!


