आई रस्त्यात निपचित, चिमुकला पित राहिला दूध, 3 वर्षांच्या मुलीचा सुन्न करणारा आक्रोश

Last Updated:

Amravati News: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा याठिकाणी ऐन होळीच्या दिवशी एक हृदयद्रावक चित्र बघायला मिळालं.

News18
News18
परतवाडा: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा याठिकाणी ऐन होळीच्या दिवशी एक हृदयद्रावक चित्र बघायला मिळालं. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अमरावती परतवाडा मार्गावरील एका बस स्थानकाबाहेर फुटपाथला लागून एक महिला जमीनीवर पडली होती. तिच्या कुशीत एक दीड वर्षांचा मुलगा होता. बाजुलाच तीन वर्षांची मुलगी आक्रोश करत होती. बाजुला होळीच्या सणासाठी घेतलेलं सामान पडलं होतं. आसपास लोकांची गर्दी होती, पण या घडणाऱ्या प्रकाराकडे कुणाचंच लक्ष नव्हतं.
आई निपचित पडलीय, तिची काहीच हालचाल होत नाही, हे पाहून तीन वर्षांची मुलगी जीवांच्या आकांताने रडत होती. ती आपल्या आईला हाक मारून उठवत होती. पण आईकडून काहीच साद मिळत नव्हती. घाबरलेली मुलगी एकीकडे आपल्या दीड वर्षांच्या भावाला सांभाळत होती. बाजुला पडलेल्या होळीच्या सामानावरही लक्ष देत होती. बस स्थानकापुढे रस्त्यावर बराच वेळ हे दृश्य दिसत होतं.
advertisement
ऐन होळीच्या दिवशी एक महिला अशाप्रकारे रस्त्याच्या बाजुला पडल्याने ये-जा करणारे लोक 'महिलेनं दारु प्यायली असावी', असं समजून पुढे निघून जात होते. कुणीही मदतीला सरसावलं नाही. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या एकाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, संबंधित महिलेला भोवळ आल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तातडीने महिलेसह दोन्ही चिमुकल्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. इथं महिलेवर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था देखील पोलिसांनी केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला आदिवासी समाजातील आहे. परतवाडा शहराला लागून असलेल्या भागात मेळघाटमधील अनेक आदिवासी बांधव स्थलांतरित झाले आहेत. शिवाय होळीच्या सणानिमित्त मेळघाटमधून आदिवासी बांधव परतवाडा याठिकाणी होळीच्या खरेदीसाठी येतात. गुरुवारी पीडित महिला देखील अशाच प्रकारे होळीची खरेदी करायला आपल्या दोन चिमुकल्यांसह आली होती. होळीची खरेदी झाल्यानंतर अचानक महिलेला भोवळ आली आणि ती रस्त्याच्या बाजुलाच फुटपाथजवळ बेशुद्ध पडली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आई रस्त्यात निपचित, चिमुकला पित राहिला दूध, 3 वर्षांच्या मुलीचा सुन्न करणारा आक्रोश
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement