29 पैकी कोणत्या 15 महानगरपालिकांमध्ये असणार महिला राज, पाहा संपूर्ण यादी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी १३ ठिकाणी महिला महापौर विराजमान होणार आहेत. ओपनमध्ये ९, OBCमध्ये ४ महिला महापौर, आरक्षणामुळे महिलांना मोठे प्रतिनिधित्व मिळाले.
महिला कुठेही कमी नाहीत आता घरासोबतच त्या संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत. राज्यातील 29 पैकी ओपन प्रवर्गातील 9 महिनगरपालिकांमध्ये महिलाराज असणार आहे. तर OBC प्रवर्गापैकी 4 ठिकाणी महिलांची सत्ता असेल. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत अखेर जाहीर झाली आहे.
मंत्रालयातील परिषद सभागृहात नगरविकास विभागामार्फत ही सोडत काढण्यात आली. यामध्ये महिला आरक्षणाचा मोठा प्रभाव दिसून येत असून, एकूण २९ पैकी १३ महानगरपालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होणार आहेत.
ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाचे गणित
सोडतीनुसार ओपनमध्ये 9 जिल्ह्यांच्या महापौर या महिला असणार आहेत. OBC प्रवर्ग एकूण ४ महानगरपालिकांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झाले आहे. यामध्ये चक्राकार पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. आरक्षणाच्या ५० टक्के नियमानुसार आणि सोडतीतील चिठ्ठ्यांच्या आधारावर यंदा महिलांना मोठे प्रतिनिधित्व मिळाले आहे. २९ शहरांपैकी १३ शहरांची धुरा महिलांच्या हाती असेल.
advertisement
खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षित महानगरपालिका
धुळे महानगरपालिका - महिला आरक्षित
नवी मुंबई महानगरपालिका - महिला आरक्षित
नांदेड-वाघाडा महानगरपालिका- महिला आरक्षित
नागपूर महानगरपालिका - महिला आरक्षित
नाशिक महापालिका - महिला आरक्षित परभणी
पुणे महानगरपालिका - महिला आरक्षित
बृहन्मुंबई महानगरपालिका - महिला आरक्षित
मालेगाव महानगरपालिका - महिला आरक्षित
मिरा-भाईंदर महानगरपालिका- महिला आरक्षित
जालना महापालिका (महिला )
advertisement
ओबीसी महापौर
लातूर महापालिका (महिला )
अहिल्यानगर महापालिका ( महिला )
चंद्रपूर महानगरपालिका ( महिला )
जळगांव महानगरपालिका ( महिला )
यामध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ९ जागा आणि ओबीसी महिलांसाठी ४ जागा अशा पद्धतीने विभागणी होण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई आणि जळगाव यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये महिला आरक्षणाचा पेच किंवा संधी काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 1:24 PM IST










