Mayor Salary : शहराच्या 'बॉस'ला सॅलरी किती; महापौरांचा पगार आणि त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात?

Last Updated:

Mayor Reservation : राज्यात महापालिका निवडणुका पार पडल्या, नगरसेवक निवडून आले आता महापालिकेच्या महापौरपदासाठी चढाओढ सुरू झाला आहे. महापालिकांमधील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर होतं आहे. अशात महापौर म्हणजे कोण, त्याचं काम काम काय, तो काय करतो, त्यांना पगार किती, त्यांना कोणते अधिकार असतात याबाबत संपूर्ण माहिती.

News18
News18
महानगरपालिकेचा प्रमुख म्हणजे महापौर. महापौर हा महापालिकेचा राजकीय आणि प्रतिनिधीक प्रमुख असतो. तो लोकांमधून निवडून आलेला नगरसेवक असतो आणि नंतर नगरसेवकांमधूनच महापौर म्हणून निवडला जातो.
महापौर हा प्रशासकीय अधिकारी नसून लोकप्रतिनिधी असतो. म्हणून त्याला शहराचा प्रथम नागरिक म्हणून ओळखलं जातं. हे पद प्रतिष्ठेचं, जबाबदारीचं आणि लोकांचं प्रतिनिधित्व करणारं आहे.  शहराच्या समस्या, अपेक्षा आणि भावना सरकार, प्रशासनापर्यंत पोहोचवणं ही त्याची मुख्य भूमिका असते.
महापौराचं काम काय?
पूर, महामारी, आग आणि इतर आपत्तीच्या वेळी महापौराची भूमिका महत्त्वाची ठरते. तो जनतेशी संवाद साधतो, प्रशासनाकडून माहिती घेतो आणि मदतकार्याचा आढावा घेतो. प्रत्यक्ष निर्णय प्रशासन घेत असलं, तरी महापौर लोकांचा प्रतिनिधी म्हणून जनतेला धीर देण्याचं आणि प्रशासनावर लक्ष ठेवण्याचं काम करतो.
advertisement
महापौराकडे प्रत्यक्ष प्रशासकीय सत्ता नसते. तरीही त्याच्याकडे काही महत्त्वाचे अधिकार असतात. तो महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान भूषवतो, सभा बोलावतो, चर्चेला दिशा देतो आणि ठरावांवर सही करतो. शहराच्या वतीने शासकीय पाहुणे, परदेशी शिष्टमंडळे किंवा मान्यवरांचे स्वागत करणं हेही महापौराचे कर्तव्य असतं.
advertisement
शहराच्या विकासासंदर्भातील मुद्दे तो राज्य सरकारसमोर मांडतो. मात्र महापौराला अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या किंवा बजेट तयार करण्याचे अधिकार नसतात. हे सर्व अधिकार प्रशासकीय प्रमुखांकडे असतात.
मग महापौरपदाचं महत्त्व काय?
महापौर हे पद केवळ शोभेचं नाही. शहराचा चेहरा म्हणून तो ओळखला जातो. लोकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणं, शहराच्या विकासाबाबत चर्चा घडवून आणणं आणि प्रशासनाला उत्तरदायी ठेवणं हे महापौराचं खरं योगदान असतं. अनेकदा हे पद पुढील मोठ्या राजकीय भूमिकेचा पाया ठरते.
advertisement
महापौर हा सत्तेचा राजा नसतो, तर शहराचा प्रतिनिधी असतो. अधिकार मर्यादित असले तरी नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि लोकांचा विश्वास असेल, तर महापौर शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावू शकतो. मजबूत लोकशाहीसाठी सक्षम, जाणकार आणि संवेदनशील महापौर अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
महापौराला पगार किती?
महाराष्ट्रातील महापौरांना दिला जाणारा पगार सार्वत्रिकपणे एका कायद्याने निश्चित केलेला नाही, तर तो मानधन, भत्ता आणि सुविधांच्या स्वरूपात विभागला जातो. वेगवेगळ्या महापालिका,  ए प्ल, ए, बी, सी, डी असे वर्ग आणि राजकीय निर्णयांनुसार हे भत्ते बदलू शकतात.
प्रत्यक्षात महापौरांना मिळणारं वेतन हे तुटपुंजं असतं. पण भत्ता आणि इतर सोयीसुविधा यावर एकूण पगार अवलंबून असतो. salary.comच्या रिपोर्टनुसार देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईच्या महापौरांचा सरासरी वार्षिक पगार 6.5 लाख रुपये म्हणजे महिन्याला 54,000 रुपये आहे. पुणे महापालिकेच्या महापौरांना वर्षाला 6,15,565 रुपये म्हणजे महिन्याला 51,000 रुपये तरनागपूर महापालिकेच्या महापौरांना वर्षाला 5,06,857 रुपये म्हणजे महिन्याला 42,000 रुपये आहे.
advertisement
याशिवाय महापौराना अधिकृत वाहन, ड्रायव्हर, राहण्यासाठी घर अशा सुविधाही मिळतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mayor Salary : शहराच्या 'बॉस'ला सॅलरी किती; महापौरांचा पगार आणि त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात?
Next Article
advertisement
Mayor Reservation List: मुंबई महापौर आरक्षण सोडतीवरून राडा,  ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आक्रमक, नेमकं कारण काय?
महापौर आरक्षण सोडतीत राडा, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आक्रमक, नेमकं कारण काय?
  • २९ महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात पार पडली

  • मुंबई महापालिकेच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

  • किशोरी पेडणेकर यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेत सरकारला धारेवर धरले

View All
advertisement