Mayor Reservation Lottery List: मुंबई-पुण्यात महिला, 8 जिल्ह्यांत OBC महापौर, वाचा संपूर्ण लिस्ट

Last Updated:

Full List of 29 Municipal Mayor Reservation : राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदासाठीची बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत आज मंत्रालयात पार पडली. तुमच्या शहरात कोणाची वर्णी लागणार, पाहा यादी

२९ महापालिकांचे 'कारभारी' ठरले! महापौरपदाचे आरक्षण जाहीर; पाहा तुमच्या शहरात कोणाची वर्णी?
२९ महापालिकांचे 'कारभारी' ठरले! महापौरपदाचे आरक्षण जाहीर; पाहा तुमच्या शहरात कोणाची वर्णी?
मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदासाठीची बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत आज मंत्रालयात पार पडली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या सोडतीने अनेक प्रस्थापित नेत्यांचे राजकीय गणित बिघडवले असून, नवीन चेहऱ्यांसाठी सत्तेची कवाडे उघडली आहेत.
Live Updates:
ठाणे - अनुसुचित जाती ( महिला किंवा पुरुष )
29 महापालिकांपैकी आठ महापालिकेत आरक्षण असेल
आठ महापालिकेत ओबीसी महापौर
पनवेल , इचलकरंजी , अकोला , अहिल्यानगर , कोल्हापूर , उल्हास नगर , चंद्रपूर , जळगाव यात ओबीसी होणार महापौर
अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव, अकोला महिलांसाठी राखीव
17 महापालिका खुल्या - अमरावती , छत्रपती संभाजी नगर , धुळे , नवी मुंबई , नांदेड , नागपूर , नाशिक , परभणी , पुणे , मुंबई , मालेगाव , मीरा भाईंदर , वसई विरार , सांगली ,सोलापूर
advertisement
मुंबई महापालिकेत खुला प्रवर्ग जाहिर
१७ महानगरपालिका खुल्या प्रवर्गात
आता यापैकी ९ ठिकाणी महिला महापौर होणार
15 महापालिका खुल्या, सर्वसाधारण महिला महापौर - पुणे , धुळे , मुंबई , नवी मुंबई ,नांदेड , मालेगाव ,मीरा भाईंदर ,नागपूर

मंत्रालयात चिठ्ठी निघाली, अनेकांची धाकधूक वाढली!

सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात चक्राकार (Rotation) पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. २०११ च्या जनगणनेचा आधार घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठीचे ५० टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे आगामी अडीच वर्षांसाठी कोणत्या महापालिकेवर कोणत्या गटाचे वर्चस्व असेल, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
advertisement

५० टक्के 'महिला राज'; मोठ्या शहरात कोणाची सरशी?

यावेळच्या सोडतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी असलेले ५० टक्के आरक्षण. यामुळे मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये महिला महापौर विराजमान होणार आहे.

> महापौर पदाचे आरक्षण, महापालिकानिहाय यादी...

महापौैरपदाच्या आरक्षण सोडतीला सुरुवात झाली असून यादी अपडेट होत आहे....
महानगपालिका कोणत्या घटकाला आरक्षण
बृहन्मुंबई महानगरपालिकाopen (महिला)
नागपूर महानगरपालिकाopen (महिला)
पुणे महानगरपालिकाopen (महिला)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाopen (महिला)
ठाणे महानगरपालिकाSC प्रवर्गासाठी
नवी मुंबई महानगरपालिकाopen (महिला)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाअनुसूचित जमातीसाठी - ST
उल्हासनगर महानगरपालिकाOBC
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकाopen (महिला)
मीरा-भाईंदर महानगरपालिकाopen (महिला)
वसई-विरार महानगरपालिकाopen
पनवेल महानगरपालिकाOBC
नाशिक महानगरपालिकाopen
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाopen
सोलापूर महानगरपालिकाopen
कोल्हापूर महानगरपालिकाopen
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका
open
अहिल्यानगर महानगरपालिकाOBC (महिला राखीव)
धुळे महानगरपालिकाopen (महिला)
जळगाव महानगरपालिकाOBC (महिला राखीव)
मालेगाव महानगरपालिकाopen (महिला)
नांदेड-वाघाळा महानगरपालिकाopen
लातूर महानगरपालिकाSC प्रवर्गासाठी (महिलांसाठी राखीव)
परभणी महानगरपालिकाopen
अमरावती महानगरपालिकाopen
अकोला महानगरपालिकाOBC (महिला राखीव)
चंद्रपूर महानगरपालिकाOBC (महिला राखीव)
जालना महानगरपालिकाSC प्रवर्गासाठी (महिलांसाठी राखीव)
इचलकरंजी महानगरपालिकाOBC
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mayor Reservation Lottery List: मुंबई-पुण्यात महिला, 8 जिल्ह्यांत OBC महापौर, वाचा संपूर्ण लिस्ट
Next Article
advertisement
Mayor Reservation Lottery List: मुंबई-पुण्यात महिला, 8 जिल्ह्यांत OBC महापौर, वाचा संपूर्ण लिस्ट
Mayor Reservation: मुंबई-पुण्यात महिला, 8 जिल्ह्यांत OBC महापौर, संपूर्ण लिस्ट
  • २९ महापालिकांच्या महापौरपदासाठीची बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत आज मंत्रालयात पार

  • या सोडतीने अनेक प्रस्थापित नेत्यांचे राजकीय गणित बिघडवले

  • नवीन चेहऱ्यांसाठी सत्तेची कवाडे उघडली आहेत.

View All
advertisement