70 की 40 किलो? ट्रेनमधून एकावेळी किती सामान घेऊन जाता येतं, तुम्हाला माहितीय का हा नियम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जर तुम्ही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करत असाल तर रेल्वेच्या नियमांनुसार तुम्ही 40 किलो वजनाचे सामान सोबत नेऊ शकता.
मुंबई: भारतात दररोज जवळपास दोन ते अडीच कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे ही भारतीय दळणवळणाची लाईफ लाईन आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रवाशांच्या प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे अनेक व्यवस्था पुरवते. तसेच प्रवाशांनीही नियम पाळावे अशी अपेक्षा असते.
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ट्रेनमध्ये तुमच्याबरोबर किती सामान नेण्याची परवानगी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? अनेकदा प्रवाशांपेक्षा जास्त सामान असते, त्यामुळे रेल्वेने सामानाची मर्यादा ठरवली आहे. पण, बऱ्याच प्रवाशांना याबद्दल माहीत नसते. ते अनेकदा ठराविक लिमिटपेक्षा जास्त सामान घेऊन जातात. मात्र असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.
advertisement
कोचनुसार असते लगेज मर्यादा
- ट्रेनमध्ये तुम्ही सोबत 40 ते 70 किलोपर्यंत वजनाचे सामान घेऊन जाऊ शकता. मात्र, कोचच्या कॅटेगरीनुसार प्रवासी कोणत्या कॅटेगरीत किती सामान ठेवू शकतो, ते ठरवलं जातं.
-जर तुम्ही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करत असाल तर रेल्वेच्या नियमांनुसार तुम्ही 40 किलो वजनाचे सामान सोबत नेऊ शकता. परंतु, जर तुम्ही ठराविक मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन प्रवास केलात तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
advertisement
-जर तुम्ही ट्रेनच्या थर्ड एसी क्लासमधून प्रवास करत असाल तर तुम्ही 40 किलो वजन असलेले सामान सोबत नेऊ शकता. तर सेकंड एसीमध्ये ही मर्यादा 50 किलो इतकी ठरवण्यात आली आहे.
-जर तुम्ही ट्रेनच्या फर्स्ट क्लास एसी कोचमधून प्रवास करत असाल तर तुम्ही 70 किलो वजन असलेले सामान सोबत नेऊ शकता. यापेक्षा जास्त सामान घेऊन ट्रेनने प्रवास करायचा असेल तर त्यासाठी लगेज व्हॅन बुक करावी लागते.
advertisement
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वेच्या गाईडलाईन्स
दिवाळीत मुंबईतील वांद्रे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत जवळपास नऊ प्रवासी जखमी झाले होते. यानंतर पश्चिम रेल्वेने गाड्या आणि स्थानकांमधील गर्दी कमी करण्यासाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा असं आढळतं की, प्रवासी मोठ्या प्रमाणात सामान घेऊन स्टेशनवर येतात आणि गाड्यांमध्ये चढतात. जास्त सामानामुळे स्थानकावर गर्दी वाढते आणि प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यास अडचण येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2024 1:50 PM IST
मराठी बातम्या/मनी/
70 की 40 किलो? ट्रेनमधून एकावेळी किती सामान घेऊन जाता येतं, तुम्हाला माहितीय का हा नियम










