Success Story : खर्च अगदी कमी अन् 8 पट नफा, शेतकऱ्यानं केली कमाल, नेमकी कशी करतोय शेती?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
त्यांनी सांगितले की, मागील 10 वर्षांपासून ते पुरुष-महिला (Male-Female) दोन्ही कंपोजिशन मिळून पडवळची शेती करत आहे.
विक्रम कुमार झा, प्रतिनिधी
पूर्णिया, 13 सप्टेंबर : पडवळची शेती ही खूप फायदेशीर असते. कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवता येते. हे आणखी एका शेतकऱ्याने सिद्ध करुन दाखवले आहे. या शेतकऱ्याने एक, दोन नही तर तब्बल 8 प्रकारची पडवळ शेती केली आणि या माध्यमातून 8 पट उत्पन्न घेऊन दाखवले आहे.
मायानंद विश्वास असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मायानंद सांगतात की, ते 2013 पासून पडवळची शेती करत आहेत. वर्षातून 9 महिने याचे उत्पादन होते. तसेच या माध्यमातून लाखोंचा नफा होतो. पुरुष-महिला (Male-Female) हा प्रकार फक्त मानवामध्येच नाही तर भाजीपाल्यामध्येही असतो. मायानंद हे पूर्णिया येथील रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले की, मागील 10 वर्षांपासून ते पुरुष-महिला दोन्ही कंपोजिशन मिळून पडवळची शेती करत आहे. पडवळची शेती करण्याबाबत त्यांना पूर्ण माहिती भागलपूरच्या सबौर कृषी विद्यालयातून मिळाली.
advertisement
यानंतर त्यांनी एकूण एक शेतीत जवळपास 8 प्रकारची पडवळची लागवड केली आणि आज ते चांगला नफा कमावत आहेत. त्यांनी सांगितले की, वर्षभरात 9 महिन्यात शेतात पडवळचे उत्पादन होते. या माध्यमातून 8 लाख नफा मिळतो.
शेतकऱ्यांना दिला हा सल्ला -
शेतकरी मायानंद विश्वास हे शेतकऱ्यांना सल्ला देताना म्हणाले की, अनेक शेतकरी हे पडवळची शेती करू इच्छित नाही. मात्र, त्यांना पूर्ण माहिती नसल्याने खूप तोटा होतो. जर तुम्ही पडवळची शेती करत असाल, तर तुम्हाला शेतात पुरुष-महिला (Male-Female) दोन्ही रोपे लावायला हवीत. 20 रोपांमधील अंतर लक्षात घेऊन रोपे लावा आणि तुमच्या पडवळची चांगली रचना केल्यास चांगले उत्पादन मिळेल, असेही ते म्हणाले.
Location :
Bihar
First Published :
September 13, 2023 12:41 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : खर्च अगदी कमी अन् 8 पट नफा, शेतकऱ्यानं केली कमाल, नेमकी कशी करतोय शेती?