पुण्यातील शेतकऱ्याची किमया, पाहा कसा पिकवला निळा तांदूळ? Video

Last Updated:

निळ्या भाताची उंची सात फुटांपर्यंत होते आणि 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होतो.

+
पुण्यातील

पुण्यातील शेतकऱ्याची किमया, पाहा कसा पिकवला निळा तांदूळ?

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : अलिकडे काही शेतकरी आपल्या शेतात नव नवे प्रयोग करताना दिसतात. पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी भागात इंद्रायणी तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आता येथील शेतकऱ्यानं इडोनेशिया, मलेशिया, थायलंड सारख्या देशात पिकणाऱ्या निळ्या तांदळाचे पीक घेण्याचा प्रयोग केला आहे. चिखलगावचे शेतकरी लहू फाले यांनी आपल्या शेतात निळा भात पिकवलाय. अगदी कमी कालावधीत हा भात तयार झाला असून या तांदळाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
advertisement
खरीप हंगामात निळ्या तांदळाची शेती
मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील प्रयोगशील शेतकरी लहू फाले यांनी खरीप हंगामात निळ्या भाताची लागवड केली होती. त्याचा तांदूळ निळसर गडद जांभळ्या रंगाचा आहे. हा भात मलेशिया, थायलंड येथेच उत्पादित होतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे याला सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केला आहे. त्यामुळे बाजारात त्याला अधिक मागणी आहे. सेंद्रिय निळा तांदूळ आरोग्यवर्धक असून यात लोह, झिंक, कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असून हा तांदूळ कर्करोग मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी उपयोगी आहे. हृदयरोग आणि कर्करोगा सारख्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी गुणकारी आहे.
advertisement
एकरी 1600 किलो उत्पन्न
फाले यांनी मुळशी तालुक्यात हा पहिलाच प्रयोग केला आहे. यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे तसेच कृषी सहाय्यक शेखर विरणक यांचे मार्गदर्शन लाभले. या भाताची उंची सात फुटांपर्यंत होते व तो 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होतो. भाताचे उत्पादन एक एकरात 1600 किलोपर्यंत होते. ह्या तांदळास प्रतिकिलो 250 रुपये बाजारभाव मिळतो. औषधी गुणधर्मामुळे भात खरेदी करण्यासाठी पुणे शहरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात पसंती देतात.
advertisement
कशी केली लागवड?
पारंपरिक पद्धतीने भात लागवड न करता यांत्रिक पद्धतीने भात लागवड केली. यामुळे मनुष्यबळ देखील कमी प्रमाणात लागतं. सेंद्रिय पद्धतीने लागवड केल्याने उंची व उत्पादन मोठ्या प्रमाणात आलं आहे, अशी माहिती शेतकरी लहू फाले यांनी दिली.
advertisement
इंडोनेशियाचं बियाणं
इंडोनेशियाचं बियाणं आहे हे सर्व प्रथम अकोला या ठिकाणी आलं होत. हा बिजोत्पादन प्रक्रियेचा प्रयोग होता. आरोग्यासाठी हा तांदूळ चांगला आहे. खाण्यासाठी हा तांदूळ इंद्रायणी भाता सारखाच आहे. 10 गुंठे जागेमध्ये ही लागवड केली आहे. बाजारभाव याला चांगला मिळतो. ड्रायक्रोमाची पूर्णपणे बीज प्रक्रिया केली आहे. मॅट पद्धतीने मशीनने लागवड केली आहे. त्यानंतर हा तयार होतो, अशी माहिती कृषी सहायक अधिकारी शेखर विरणक यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
पुण्यातील शेतकऱ्याची किमया, पाहा कसा पिकवला निळा तांदूळ? Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement