advertisement

एअरपोर्ट लाउंजच्या नियमांमध्ये एप्रिलपासून मोठा बदल; डेबिट-क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी लगेच जाणून घ्या?

Last Updated:

येत्या 1 एप्रिल 2026 पासून भारतीय बँकिंग क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' (NPCI) आणि अनेक प्रमुख बँकांनी त्यांच्या कार्ड्सच्या रिवॉर्ड स्ट्रक्चरमध्ये मोठी कपात केली आहे.

AI generated photo
AI generated photo
मुंबई : विमानाचा प्रवास म्हटला की एअरपोर्टवर दोन-तीन तास आधी पोहोचणं हे आलंच. अशा वेळी एअरपोर्टच्या आलिशान 'लाउंज'मध्ये बसून चहा-नाश्त्याचा आनंद घेत विमानाची वाट पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. खिशात असलेल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डमुळे हे 'लक्झरी' आयुष्य आपल्याला केवळ 2 रुपयांत अनुभवायला मिळतं. पण, जर तुम्हीही अशाच मोफत लाउंज ॲक्सेसच्या भरवशावर असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि थोडी धक्कादायक बातमी आहे.
येत्या 1 एप्रिल 2026 पासून भारतीय बँकिंग क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' (NPCI) आणि अनेक प्रमुख बँकांनी त्यांच्या कार्ड्सच्या रिवॉर्ड स्ट्रक्चरमध्ये मोठी कपात केली आहे. यामुळे अनेक कार्डधारकांची लाउंज एन्ट्री आता बंद होणार आहे. नक्की काय बदलले आहे आणि तुमचे कार्ड या यादीत आहे का? चला सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1. RuPay Platinum कार्डधारकांना मोठा झटका
जर तुमच्याकडे RuPay Platinum डेबिट कार्ड असेल, तर 1 एप्रिलपासून तुम्हाला एअरपोर्ट किंवा रेल्वे लाउंजमध्ये मोफत प्रवेश मिळणार नाही. NPCI ने बँकांना हे फायदे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोणत्या बँकांचा समावेश: पंजाब नॅशनल बँक (PNB), HDFC बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि ESAF स्मॉल फायनान्स बँक यांनी आधीच अधिकृतपणे ही सुविधा बंद करत असल्याचे जाहीर केले आहे. 1 एप्रिलनंतर हे कार्ड स्वाइप केल्यास तुम्हाला लाउंजमध्ये प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
advertisement
2. RuPay Select कार्ड: आता 'खर्च' करा तरच 'प्रवेश' मिळेल
RuPay Select डेबिट कार्डवर लाउंज ॲक्सेस सुरू राहील, पण तो आता 'स्पेंड बेस्ड' (Spend-based) असेल. म्हणजेच, तुम्हाला आधीच्या तीन महिन्यांत ठराविक रक्कम खर्च करावी लागेल, तरच पुढच्या तिमाहीत मोफत प्रवेश मिळेल.
उदाहरण: PNB च्या ग्राहकांना आता एका तिमाहीत किमान 5,000 रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्ही 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान 5,000 रुपये खर्च केले, तरच तुम्हाला 15 एप्रिल ते 14 जुलै दरम्यान लाउंज ॲक्सेस मिळेल.
advertisement
3. Axis Bank आणि Airtel क्रेडिट कार्डमध्ये मोठे बदल
ॲक्सिस बँकेने त्यांच्या लोकप्रिय Airtel Axis Bank Credit Card च्या रिवॉर्डमध्ये मोठे फेरबदल केले आहेत:
12 एप्रिल 2026 पासून या कार्डवर मिळणारे वर्षाचे 4 मोफत डोमेस्टिक लाउंज व्हिजिट बंद होतील.
एअरटेल बिल पेमेंटवर मिळणारा 25% कॅशबॅक आता तुमच्या इतर खरेदीवर (Base Cashback) अवलंबून असेल. तुम्ही जेवढा जास्त इतर खर्च कराल, तेवढाच जास्त कॅशबॅक तुम्हाला एअरटेल बिलावर मिळेल.
advertisement
झोमॅटो-स्विगीचे काय? Swiggy आणि BigBasket वर मिळणारा 10% कॅशबॅक बंद झाला असून, आता Zomato, Blinkit आणि District Movies वर 10% 'व्हॅल्यू बॅक' मिळेल. पण हा पैसा कार्डवर न येता संबंधित कंपनीच्या वॉलेटमध्ये जमा होईल.
बँका हे बदल का करत आहेत?
गेल्या काही वर्षांत लाउंज ॲक्सेस वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे एअरपोर्ट लाउंजमध्ये गर्दी वाढली असून बँकांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केवळ 'ॲक्टिव्ह' युजर्सनाच हे प्रीमियम फायदे मिळावेत, यासाठी बँकांनी आता 'खर्च करा आणि फायदा मिळवा' हे धोरण स्वीकारले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
एअरपोर्ट लाउंजच्या नियमांमध्ये एप्रिलपासून मोठा बदल; डेबिट-क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी लगेच जाणून घ्या?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement