प्रायव्हेट नोकरीमुळे पदरी पडली निराशा, सुरू केले चहाचे स्टॉल, आता दिवसाला बक्कळ कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अमरावतीमधील अनंत ठाकरे यांनी गेल्या 8 वर्षांपूर्वी चहाचे स्टॉल सुरू केले. प्रायव्हेट नोकरी मध्ये निराशा आल्याने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. कमीत कमी भांडवल वापरून सुरू केलेला व्यवसाय आज त्यांना दिवसाला चांगली कमाई करून देतोय.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : अमरावतीमधील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती म्हणजेच व्हिएमव्हि कॉलेज जवळ फ्रेंड्स चाय म्हणून अनंत ठाकरे यांचे छोटेसे चहाचे स्टॉल आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने ते एक प्रायव्हेट जॉब करत होते. त्यांचे शिक्षण बीकॉम द्वितीय वर्षांपर्यंत झालेले आहे. ते जेव्हा दिवसाचे 12 ते 13 तास प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होते. तेव्हा त्यांना योग्य मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन व्यवसाय करण्याचा विचार केला. मग व्यवसाय नेमका कोणता करायचा? मग सर्वात कमी भांडवल लागणारा व्यवसाय म्हणजे चहाचा. अवघ्या 500 रुपयाची गुंतवणूक करून चहाचे स्टॉल सुरू केले. आता स्वतःचा व्यवसाय असल्याने त्यांना त्यात दिवसाला अडीच ते 3 हजार रुपये कमाई होते.
advertisement
फ्रेंड्स चहाचे मालक अनंत ठाकरे यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, गेले 8 ते 10 वर्ष झालेत मी व्हिएमव्हि कॉलेज जवळ चहाचे स्टॉल सुरू केले. माझ्याकडे शेती नाही त्यामुळे मी प्रायव्हेट नोकरी करत होतो. घरची परिस्थिती बेताची असल्याने मला आई वडिलांना मदत करण्यासाठी काही न काही काम करणे गरजेचे होते.
advertisement
पुढे ते सांगतात, मी बीकॉम द्वितीय वर्षांपर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर जबाबदारी वाढली आणि मला शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत होतो. तिथे सतत 12 ते 13 तास काम करावे लागत होते. त्यामुळे इतर कामे होत नव्हती. मोबदला सुद्धा खूप कमी मिळत होता. त्यामुळे घर खर्च मुलाचे शिक्षण यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मग मी व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. पण, पुरेसे भांडवल माझ्याकडे नव्हते. त्यामुळे काही दिवस तो विचार थांबवला.
advertisement
एक दिवस व्हिएमव्हि कॉलेज जवळून जात असताना बघितले की इथे एकही दुकान नव्हते. मग विचार आला की, आपण जर चहाचे स्टॉल सुरू केले तर इथे चालू शकते. त्याला भांडवल सुद्धा कमी लागेल. तेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला थोडे ग्राहक जोडायला वेळ लागला. नंतर दिवसेंदिवस ग्राहक वाढत गेले विक्री चांगली होत गेली. आधी 300 ते 500 रुपये कमाई दिवसाला होत होती. अडीच ते 3 हजार हजारापर्यंत कमाई होते. कॉलेज नियमित सुरू असल्यास जास्त कमाई होते.
advertisement
दुसऱ्याकडे दबावाखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करून आज मी माझ्या मुलाचे उच्च शिक्षण आणि घरखर्च भागवत आहे. त्याचबरोबर इतरही सोईसुविधा मी उपलब्ध करू शकतो, असे अनंत ठाकरे सांगतात.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
December 05, 2024 6:06 PM IST
मराठी बातम्या/मनी/
प्रायव्हेट नोकरीमुळे पदरी पडली निराशा, सुरू केले चहाचे स्टॉल, आता दिवसाला बक्कळ कमाई

