advertisement

Budget 2026: आता शाळेतच तयार होणार कॉन्टेंट क्रिएटर्स! सरकारने केली नव्या स्कीमची घोषणा

Last Updated:

केंद्र सरकार आता प्रोफेशनल कॉन्टेंट क्रिएटर्स तयार करणार आहे. केंद्र सरकारने या संबंधित एक नवीन स्किमची घोषणा केली आहे. याअंतर्गत 15000 स्कूल आणि 500 कॉलेजमध्ये कॉन्टेंट क्रेएटर्स लॅब्स तयार केल्या जातील.

बजेट 2026
बजेट 2026
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, देशाला सोशल मीडिया प्रोफेशनल्सची गरज आहे. त्यांनी सांगितलं की, ही एक वाढती इंडस्ट्री आहे आणि 2030 पर्यंत देशाला असे 20 लाख प्रोफेशनल्स हवे आहेत. अर्थमंत्र्यांनी हे लक्षात ठेवत एका नव्या स्किमची घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत 15000 माध्यमिक शालांमध्ये कॉन्टेंट क्रिएटर्स तयार करण्यासाठी लॅब्स तयार केल्या जातील. हे काम इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची देखरेखीत केले जाईल. ज्याला सरकार थेट समर्थन देईल. आयआयसीटी या शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन करेल. शाळांव्यतिरिक्त, 500 महाविद्यालयांमध्येही या लॅब स्थापन केल्या जातील.
या उपक्रमामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतीलच, शिवाय भारताला जागतिक कंटेंट हब म्हणून स्थापित केले जाईल. अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की आज सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर डेटा अ‍ॅनालिटिक्स, ग्राफिक डिझाइन आणि डिजिटल मार्केटिंगसह विविध क्षेत्रांचा समावेश असलेला एक उदयोन्मुख उद्योग आहे.
advertisement
शाळांसोबत 500 कॉलेजमध्येही होईल ट्रेनिंग 
या योजनेचा विस्तार फक्त शाळांपर्यतं मर्यादित नाही. उच्च शिक्षण प्राप्त करत असलेल्या तरुणांना आणि अधिक तांत्रिकरित्या सक्षम बनवण्यासाठी देशातील 500 प्रमुख कॉलेजमध्येही या लॅप्सची निर्मिती केली जाईल.
या लॅब्समधून विद्यार्थ्यांना व्हिडिओ एडिटिंग, पॉडकास्टिंग, स्क्रिप्टरायटिंग आणि सोशल मीडिया मॅनेडमेंटसाठी आवश्यक असलेली आधुनिक उपकरणे आणि सॉफ्टवेअर उपलब्ध होतील. सरकारचा उद्देश असा एक परिसंस्था तयार करणे आहे जिथे विद्यार्थ्यांना पदवी व्यतिरिक्त डिजिटल जगासाठी आवश्यक असलेली व्यावहारिक कौशल्ये देखील मिळतील.
advertisement
क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये भाराताची नवी झेप 
भारत सध्या जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया बाजारामधून एक आहे. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि डिजिटल अ‍ॅडव्हर्टाजिंगची वाढती मागणी पाहता, सरकारची ही गुंतवणूक दूरदर्शी मानली जात आहे. IICT या लॅप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फक्त कॉन्टॅंट बनवणे शिकवेल, यासोबतच त्यांना डिजिटल एथिक्स, कॉपीराइट कायदा आणि मोनेटायजेशनचे बारकावेही शिकवेल. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना येत्या काळात घरबसल्या उत्पन्न मिळवण्याचे आणि मोठ्या ब्रँडशी जोडण्याचे मार्ग खुले होतील.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Budget 2026: आता शाळेतच तयार होणार कॉन्टेंट क्रिएटर्स! सरकारने केली नव्या स्कीमची घोषणा
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement