advertisement

नोकरदारांच्या पदरी निराशा, टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही, जुन्या आणि नव्या रिजीममध्ये काय फरक?

Last Updated:

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये टॅक्स स्लॅब बदलले नाहीत, ITR मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली, TDS TCS कपात, १२ लाखांपर्यंत टॅक्स रिबेट कायम.

News18
News18
संपूर्ण बजेट सादर झालं तरी नोकरदार वर्गात काहीच मिळालं नाही अशी भावना आता बजेटनंतर झाली आहे. किमान बजेटकडून Income Tax मध्ये काहीतरी दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र .या सगळ्या आशांवर पाणी फिरलं आहे. नोकरदार वर्गाचे डोळे लागून राहिलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की, नवीन आणि जुन्या दोन्ही टॅक्स रिजीममध्ये स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, करदात्यांना दिलासा देण्यासाठी आयटीआर भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
बजेटमधील २ महत्त्वाचे बदल
ITR डेडलाईन वाढली: आता सुधारित आयटीआर भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत थांबण्याची गरज नाही, ही मुदत आता ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे. TDS आणि TCS मध्ये कपात: काही विशिष्ट व्यवहारांवर लागणारा टीडीएस आणि टीसीएस कमी केल्यामुळे हातात येणाऱ्या पैशांचे प्रमाण किंचित वाढू शकते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना कलम 87A अंतर्गत पूर्ण टॅक्स रिबेट मिळते. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या १२ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही.
advertisement
नव्या आयकर रिजीमनुसार टॅक्स स्लॅब
0 – 4,00,000Nil
4,00,001 – 8,00,0005%
8,00,001 – 12,00,00010%
12,00,001 – 16,00,00015%
16,00,001 – 20,00,00020%
20,00,001 – 24,00,00025%
24,00,000 रुपयांपेक्षा जास्त30%
advertisement
4 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही.
4 ते 8 लाख रुपयांवर 5% कर.
8 ते 12 लाख रुपयांवर 10% कर.
12 ते 16 लाख रुपयांवर 15% कर.
16 ते 20 लाख रुपयांवर 20% कर.
20 ते 24 लाख रुपयांवर 25% कर.
24 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर.
जुनी टॅक्स रिजीम सवलती कायम
जुन्या कर प्रणालीमध्ये अजूनही कलम 80C, 80D आणि गृहकर्ज व्याजदरात सूट मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत मर्यादा देखील जास्त आहे. म्हणूनच बरेच लोक अजूनही जुन्या प्रणालीला प्राधान्य देतात. २०२६ च्या बजेटमधून ही सूट वाढवण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र असं काहीच झालं नाही. सरकार हळूहळू जुनी कर प्रणाली रद्द करू शकते अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या, याबद्दल कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
advertisement
जुन्या टॅक्स स्लॅब रिजीमनुसार टॅक्स स्लॅब
इनकम टॅक्स स्लॅबकाय आहे रेट
2,50,000 पर्यंतNil
2,50,001 – 5,00,0005%
5,00,001 – 10,00,00020%
10,00,000 पेक्षा जास्त30%
view comments
मराठी बातम्या/मनी/
नोकरदारांच्या पदरी निराशा, टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही, जुन्या आणि नव्या रिजीममध्ये काय फरक?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement