Food Business: ब्रँड सोडा, इथं फेमस आहे गावचा पेढा, आजोबांची कमाई नको, खवय्यांची गर्दी पाहा!
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Food Business: एका गावातल्या हॉटेलमध्ये बनवलेला पेढा फेमस ब्रँड झाला आहे. मुस्ती येथील पेढा खाण्यासाठी नेहमी गर्दी असते.
सोलापूर: एखाद्याच्या हाताला चव असेल तर त्याने बनवलेले पदार्थ खाण्यासाठी खवय्ये कितीही लांबून तिथं जातात. पण ही चव टिकवून स्वत:चा ब्रँड तयार करणं काही जणांनाच जमतं. दक्षिण सोलापूरमधील मुस्ती गावात 59 वर्षीय सुरेश वाकडे राहतात. त्यांनी आपल्या छोट्याशा हॉटेलमध्ये बनवलेला पेढा खाण्यासाठी नेहमीच गर्दी असते. विशेष म्हणजे हा गावचा पेढा चांगलाच फेमस झाला असून रोज 5 हजार रुपयांची विक्री होतेय. यातून चांगली कमाई देखील होत असल्याचं लोकल18 सोबत बोलताना वाकडे सांगतात.
मुस्ती येथील सुरेश वाकडे हे 59 वर्षांचे असून ते 1995 पासून गावातच बसवेश्वर या नावाने हॉटेल चालवतात. या लहानशा हॉटेलमध्ये त्यांनी बनवलेला पेढा खाण्यासाठी खवय्यांची गर्दी असते. दररोज 35 लिटर दूध उकळून केवळ सात किलो पेढा बनवला जातो. विशेष म्हणजे हा पेढा काही तासातच संपतो.
advertisement
कसा बनतो पेढा?
दररोज सकाळी म्हशीचे 35 ते 40 लिटर दूध आणून हा पेढा तयार केला जातो. दुधाला जवळपास तीन ते चार तास उकळून त्यामध्ये साखर घालून पेढा बनवला जातो. जवळपास 35 ते 40 लिटर दुधापासून 7 ते 8 किलो पेढा तयार होतो. एका पेढ्याची किंमत 20 रुपये इतकी आहे. तर 400 रुपये किलो दराने हा पेढा विक्री केला जातो. सुरेश वाकडे यांनी तयार केलेले पेढे सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या आतच संपून जातात.
advertisement
महिन्याला 40 हजारांचा नफा
गावातच पेढा बनवून त्याची विक्री केली जाते. त्याला मागणी देखील चांगली आहे. पेढे विक्रीतून सर्व खर्च वजा करून महिन्याला 30 ते 40 हजार रुपयापर्यंत नफा मिळतो. तर वर्षाला तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. या व्यवसायात दोघे कामगार देखील मदत करतात. त्याचंही कुटूंब याच व्यवसायवर चालतं, असं वाकडे सांगतात.
advertisement
हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी
view commentsसुरेश वाकडे यांच्या बसवेश्वर हॉटेलमध्ये चहा, चुरमुरे पासून बनवलेला चिवडा, कांदा भजी, मिरची भजी देखील खाण्यासाठी उपलब्ध आहे. सुरेश यांचा पेढा खाण्यासाठी बोरामणी, कुंभारी, तांदूळवाडी, निलेगाव तसेच धाराशिव, तुळजापूर, लातूर, मुंबई पुणे येथून सुद्धा ग्राहक येत असतात. लोकांना खाण्यासाठी दर्जेदार क्वालिटी दिली तर लोक आपल्याला शोधून येतात, असं सुरेश सांगतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Aug 20, 2025 2:28 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Food Business: ब्रँड सोडा, इथं फेमस आहे गावचा पेढा, आजोबांची कमाई नको, खवय्यांची गर्दी पाहा!










