दिवसाला करायचा कंडोमच्या 19 ऑर्डर्स; खर्च केले 1,06,398 रुपये; Swiggy Instamartच्या युझर्सची देशभरात चर्चा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Swiggy Instamart Report: 2025 मधील ऑनलाइन खरेदीच्या ट्रेंडमध्ये कंडोम्सची मागणी विशेष चर्चेत आली असून, एका युझरने वर्षभरात तब्बल 228 ऑर्डर्स देत 1 लाखांहून अधिक खर्च केला. Instamart च्या अहवालातून वैयक्तिक गरजांच्या वस्तूंबाबत भारतीय ग्राहकांची बदलती मानसिकता समोर आली आहे.
मुंबई: Swiggy Instamart ने आपल्या वर्षअखेरीच्या अहवालात 2025 मध्ये भारतात लोकांनी ऑनलाइन खरेदी कशी केली, याचा रंजक आणि अनेकदा धक्कादायक आढावा सादर केला आहे. या रिपोर्टमधून काही अत्यंत वेगळे आणि गमतीशीर खरेदी ट्रेंड समोर आले असून, त्यात चेन्नईतील एका युझर ची खरेदी विशेष चर्चेत आली आहे. या युझरने फक्त कंडोम्सवर संपूर्ण वर्षात तब्बल 1,06,398 रुपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे, या व्यक्तीने वर्षभरात एकूण 228 वेगवेगळ्या ऑर्डर्स कंडोम्ससाठी दिल्या, म्हणजे सरासरी महिन्याला जवळपास 19 ऑर्डर्स.
advertisement
रिपोर्ट नमूद करण्यात आले आहे की, “चेन्नईतील एका सिंगल अकाउंटने 228 वेगवेगळ्या कंडोम ऑर्डर्स देत एकूण 1,06,398 रुपये खर्च केले, जे ‘आधीच नियोजन करून ठेवण्याचा’ एक हलकाफुलका पण लक्षवेधी नमुना आहे.” हा ट्रेंड अपवादात्मक वाटत असला, तरी अहवालानुसार कंडोम्स हा Instamartवरील लोकप्रिय प्रॉडक्ट्सपैकी एक ठरला आहे. दर 127 ऑर्डर्सपैकी एका ऑर्डरमध्ये कंडोम्सचा समावेश होता. विशेषतः सप्टेंबर महिन्यात कंडोम विक्रीत 24 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. ज्यामुळे तो महिना या उत्पादनासाठी सर्वाधिक मागणीचा ठरला.
advertisement
अहवालातील इतर ठळक बाबीही तितक्याच लक्षवेधी आहेत. मुंबईतील एका अकाउंटने फक्त Red Bull Sugar Free वर तब्बल 16.3 लाख रुपये खर्च केले. याच वेळी चेन्नईतील दुसऱ्या एका वापरकर्त्याने पाळीव प्राण्यांच्या (Pet Supplies) वस्तूंवर एकट्या 2.41 लाख रुपयांची खरेदी केली.
advertisement
बेंगळुरूतील एका युझरने तर डिलिव्हरी पार्टनर्सना तब्बल 68,600 रुपये टिप्स दिल्या. ज्यामुळे शहराची उदार वृत्ती पुन्हा एकदा समोर आली. चेन्नई यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले, जिथे एकूण 59,505 रुपयांचे टिप्स देण्यात आले. अहवालात गंमतीशीर शब्दांत नमूद करण्यात आले आहे की, “बेंगळुरू जरी भारताची टेक कॅपिटल असली, तरी ते देशाची टिपिंग कॅपिटलही आहे.”
advertisement
इतर काही अतिशय मोठ्या खरेदींचाही उल्लेख या अहवालात आहे. नोएडातील एका वापरकर्त्याने एका सिंगल ऑर्डरमध्ये ब्लूटूथ स्पीकर्स, SSDs आणि रोबोटिक व्हॅक्युम क्लिनर्सवर 2.69 लाख रुपये खर्च केले. याहूनही पुढे जात, हैदराबादमधील एका वापरकर्त्याने एका क्लिकमध्ये तीन iPhone 17 खरेदी करत तब्बल 4.3 लाख रुपये खर्च केले.
advertisement
सण-उत्सवांच्या काळातील खरेदी सवयीही या अहवालातून स्पष्ट होतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दर मिनिटाला सरासरी 666 गुलाबांची ऑर्डर देण्यात आली, यावरून या दिवसाची लोकप्रियता अधोरेखित होते. तसेच रक्षा बंधन, फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेंटाईन डे हे 2025 मधील सर्वाधिक गिफ्ट दिले जाणारे दिवस ठरले. Instamart च्या “Giftables” फीचरचा या काळात मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.
advertisement
एकूणच Swiggy Instamart च्या या अहवालातून भारतामधील डिजिटल खरेदीच्या बदलत्या सवयी स्पष्टपणे दिसून येतात. आज ग्राहक फक्त किराणा सामानापुरते मर्यादित न राहता, iPhone, इलेक्ट्रॉनिक्स, लक्झरी वस्तू, एनर्जी ड्रिंक्स, पाळीव प्राण्यांचे साहित्य आणि वैयक्तिक गरजांच्या वस्तूही ऑनलाइन ऑर्डर करत आहेत. 2025 मध्ये भारताने डिजिटल शॉपिंगच्या बाबतीत एक नवा आणि वेगळाच पैलू या अहवालातून दिसून येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 11:31 PM IST
मराठी बातम्या/मनी/
दिवसाला करायचा कंडोमच्या 19 ऑर्डर्स; खर्च केले 1,06,398 रुपये; Swiggy Instamartच्या युझर्सची देशभरात चर्चा











