advertisement

Ladki Bahin: ‘त्या’ लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता 500 रुपयेच जमा होणार, कारण काय? तुम्हाला किती मिळणार?

Last Updated:

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेतून काही महिलांच्या खात्यावर फक्त 500 रुपयेच जमा होत आहेत. याप्रकरणी महिला व बालकल्याण विभागाने माहिती दिलीये.

Ladki Bahin: ‘त्या’ लाडक्या बहिणींना आता 500 रुपयेच मिळणार, काय आहे कारण?
Ladki Bahin: ‘त्या’ लाडक्या बहिणींना आता 500 रुपयेच मिळणार, काय आहे कारण?
पुणे : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून राज्यातील महिलांना 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येते. महायुती सरकारीने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही महत्त्वाकांक्षी योजना लागू केली. परंतु, आता काही महिलांच्या बँक खात्यात केवळ 500 रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली. 1500 रुपये ऐवजी 500 रुपये खात्यावर का जमा झाले? याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. याबाबत आता महिला व बालकल्याण विभागाने माहिती दिलीये.
पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजेतून काही महिलांना लाभ मिळतो. त्या महिलांना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून दरमहा 1500 रुपयांऐवजी 500 रुपये देण्यात येत असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे.
दरम्यान, राज्य शासनाने जुलै 2024 पासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली. या योजनेद्वारे पात्र महिलांना जुलै 2024 ते मार्च 2024 या कालावधीत 9 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कमदी मिळणार याची प्रतीक्षा आहे. अशातच राज्य सरकार अक्षय तृतीयेला खात्यावर 1500 रुपये पाठवणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद
राज्यातील कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नसलेल्या महिलांनाच आता लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार आहेत. निराधार योजनेतून पैसे घेणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला आहे. तसेच सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 500 रुपये पाठवण्यात येत आहेत.
या महिलांना दोन्ही योजनेतील लाभ
पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून दरवर्षी प्रत्येकी 6 हजार रुपये दिले जातात. म्हणजेच एखादी महिला या दोन्ही योजनांची लाभार्थी असेल तर तिला एका वर्षामध्ये 12 हजार रुपये मिळतील. या महिलांना उरलेल्या 6 हजार रुपयांची रक्कम प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी ही योजनेतून दिली जाणार आहे.
advertisement
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील नियमात दिवसेंदिवस बदल होत आहेत. सुरुवातीला अर्ज करणाऱ्या बहुतांश महिलांना 1500 रुपये देण्यात आले होते. परंतु, त्यानंतर विविध विभागांमार्फत चौकशी करून पात्रता निश्चित केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Ladki Bahin: ‘त्या’ लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता 500 रुपयेच जमा होणार, कारण काय? तुम्हाला किती मिळणार?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement