सोन्यात पैसे घालू नका! मार्केटमधील सर्वात मोठ्या एक्सपर्टनं का दिला असा सल्ला, काय आहे कारण?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोन्याचे दर MCX वर 1 लाख 7 हजार पर्यंत पोहोचले असून अजय केडिया यांच्या मते सध्या गुंतवणूक टाळावी, चांदी व तांबे पर्याय विचारात घ्या.
सोन्या चांदीच्या दरांनी नवा विक्रम नोंदवला आहे. सध्या GST सह सोन्याचे दर जवळपास 1 लाख 10 हजार रुपयांच्या आसपास पोहोचलं आहे. तर GST वगळून 1 लाख 6-7 हजार रुपयांच्या आसपास सोन्याचे दर रेंगाळत आहेत. गेल्या 20 वर्षांमधील ही सोन्याच्या दरात अभूतपूर्व वाढ झाल्याचं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. जे दर दिवाळीपर्यंत जाणं अपेक्षित होतं ते आता गणेशोत्सवातच वाढले आहेत. ही दरवाढ कायम राहणार की सोनं कमी होणार? या सगळ्यात सोनं खरेदी करावं का? तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर मार्केटमधील सर्वात मोठे एक्सपर्ट केडिया अॅडवायजरीचे अजय केडिया यांनी दिलं आहे.
आणखी किती वाढणार सोन्याचे दर?
सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून अभूतपूर्व वाढ झाली आहे, ज्यामुळे अनेकजण दिवाळीसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. सध्या सोन्याचा भाव 1 लाख 7 हजार रुपये प्रति तोळाच्या आसपास असून, दिवाळी अजून एक महिना दूर आहे. याबद्दल एका तज्ज्ञाने सांगितले की, या दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 1,7 ते 1 लाख 8 हजार पर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा दर MCX चा झाला, प्रत्यक्षात सराफ बाजारातील दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तरीही गुंतवणूक म्हणून आत्ताच सोने खरेदी करणे योग्य नाही.
advertisement
2025 हे वर्ष सोन्यासाठी विक्रमी ठरले
या वर्षी सोन्याच्या किमतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. एमसीएक्स (MCX) वर सोन्याने 36% पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे, तर गेल्या एका वर्षात ही वाढ 46% पेक्षा जास्त आहे. या वाढीमागे जागतिक भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे निर्माण झालेली अनिश्चितता ही प्रमुख कारणे आहेत. जेव्हा अनिश्चिततेचे वातावरण असतं, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानतात. याच कारणामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.
advertisement
सोन्याच्या किमतीत स्थिरता येण्याची शक्यता
तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमतीतील वाढ एका ठराविक लिमिटनंतर स्थिर राहील. रशिया-युक्रेन युद्धात शांततेची चर्चा सुरू झाली आहे आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांबाबतची अनिश्चितता कमी होत आहे. याचा अर्थ, आतापर्यंत सोन्याच्या वाढीला कारणीभूत ठरलेले घटक आता कमकुवत होत आहेत. वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांची खरेदी कमी झाली आहे, कारण आता त्यांना कमी प्रमाणात सोने खरेदी करावे लागत आहे.
advertisement
सोनं खरेदी करताय थांबा!
तज्ज्ञांनी म्हटले आहे की, सध्या सोन्याच्या किमती जास्त आहेत. जर सोन्याचा भाव 8-10 टक्क्यांनी घसरला, म्हणजे तो 94 ते 95 हजार रुपयांतच्या आसपास आला, तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. सध्याच्या दरात गुंतवणूक केल्यास अपेक्षित परतावा मिळणे थोडं कठीण आहे. त्यामुळे घाईत कोणताही निर्णय घेणं तोट्याचं ठरू शकतं. तुम्ही 40 टक्के रिटर्नची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला दीर्घकाळ वाट पाहावी लागू शकते.
advertisement
इतर पर्यायांचा विचार:
तज्ज्ञांनी सांगितले की, सध्या चांदी, तांबे आणि इतर शेअर्सचे दर सोन्याच्या तुलनेत स्वस्त आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार इतर मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात, ज्यामुळे त्यांना चांगला परतावा मिळू शकतो. या अस्थिरतेच्या काळात कोणताही अंदाज लावणे कठीण आहे. पण सध्या सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सावध रहावे. गुंतवणूकदारांनी भू-राजकीय परिस्थिती आणि इतर आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवावे. कारण अनिश्चिततेमुळे सोन्याचा दर अचानक वाढूही शकतो.
advertisement
(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती ही एक्सपर्टचं वैयक्तिक मत आहे. ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करावी, कोणत्याही नफ्या-तोट्याची न्यूज 18 मराठी खबरदारी घेणार नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 2:07 PM IST
मराठी बातम्या/मनी/
सोन्यात पैसे घालू नका! मार्केटमधील सर्वात मोठ्या एक्सपर्टनं का दिला असा सल्ला, काय आहे कारण?