Gold Price: 30 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं, अमेरिकेचंही वाढलं टेन्शन, भारतात काय स्थिती?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आंतरराष्ट्रीय बाजारात ३० वर्षांनंतर सोनं अमेरिकन ट्रेझरी बॉण्डपेक्षा वरचढ ठरलं. केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असून दर 5000 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मुंबई: 30 वर्षांत आजवर जे घडलं नाही ते आंतरराष्ट्रीय बाजारात पहिल्यांदाज घडलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा बदल घडला. तब्बल ३० वर्षांनंतर पहिल्यांदा सोने अमेरिकन ट्रेझरी बॉण्डपेक्षा वरचढ ठरलं. आता जगभरातील केंद्रीय बँकांच्या परकीय चलनसाठ्यात सोन्याचा वाटा लक्षणीय वाढला आहे. केंद्रीय बँका कागदी नोटांपेक्षा सोन्यावर जास्त भर देत आहेत. विशेषत: डॉलरवर त्यांचा विश्वास कमी होत चालला आहे. यामुळेच त्या सतत मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. जर ही खरेदी अशीच सुरू राहिली तर सोन्याच्या किमती अजून वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काळात सोनं 5000 डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
आकडे काय सांगतात?
सध्या केंद्रीय बँकांच्या एकूण साठ्यात सोन्याचा वाटा सुमारे 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. युरो मागे सरकून 16 टक्क्यांवर आला आहे. 1996 नंतर पहिल्यांदा सोन्याने अमेरिकन ट्रेझरीलाही मागे टाकलं आहे. डॉलर अजूनही 46 टक्क्यांसह सर्वात मोठा हिस्सा राखतोय, पण 2025 मध्ये त्यात जवळपास 10 टक्क्यांची घट झाली आहे. 2022 पासून दरवर्षी 1,000 टनांहून अधिक सोने केंद्रीय बँकांनी खरेदी केलं आहे. ही मागणी 2020 पूर्वीच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळेच सोन्याची किंमत आकाशाला भिडत आहे. आत्तापर्यंत ती 3,592 डॉलर प्रति औंसवर गेली आहे, जी या वर्षी एकटीच 36 टक्के वाढ दर्शवते.
advertisement
गुंतवणूकदारांसाठी संकेत
तज्ज्ञ सांगतात की, सोनं आता फक्त सुरक्षित ठेवा एवढंच राहिलेलं नाही, तर गरजेचं गुंतवणूक साधन बनतंय. गोल्डमन सॅक्सने अंदाज वर्तवला आहे की अमेरिकन ट्रेझरी मार्केटचा केवळ 1 टक्का हिस्सा सोन्यात गेला तरी दर 5,000 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. भारतात आयसीआयसीआय बँकेने 2026 च्या मध्यापर्यंत सोन्याचा दर 1,25,000 रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला आहे.
advertisement
अमेरिकेची अडचण वाढतेय
अमेरिकेत नोकरीचे आकडे कमकुवत दिसत आहेत. व्याजदरात कपातीची शक्यता आहे. व्यापारयुद्ध, कर्जवाढ आणि फेडरल रिझर्व्हवर वाढलेला अविश्वास यामुळे डॉलरचे महत्त्व घटत आहे. याच पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी आणखी वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
इंडियन बुलियन असोसिएशननुसार भारतातील सोन्याचे दर 10 ग्रॅम
24 कॅरेट सोन्याचे दर - 112180 रुपये प्रति तोळा
advertisement
23 कॅरेट सोन्याचे दर - 107496 रुपये प्रति तोळा
22 कॅरेट सोन्याचे दर - 102829 रुपये प्रति तोळा
20 कॅरेट सोन्याचे दर - 93482 रुपये प्रति तोळा
18 कॅरेट सोन्याचे दर - 84135 रुपये प्रति तोळा
14 कॅरेट सोन्याचे दर - 65442 रुपये प्रति तोळा
09 कॅरेट सोन्याचे दर - 42069 रुपये प्रति तोळा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 10:10 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Price: 30 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं, अमेरिकेचंही वाढलं टेन्शन, भारतात काय स्थिती?