Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, या जिल्ह्यांत पावसाची विश्रांती, मंगळवारचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाने उघडीप घेतली आहे. आज पुण्यासह कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा इशारा नाही.
1/7
वायव्य भारतातील वादळी प्रणालीमुळे कोकण, घाटमाथ्यासह पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. मात्र राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज 9 सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. परंतु, पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात पुढील चार दिवस पावसाच्या उघडिपीची शक्यता आहे.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 4.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 28.2 अंश सेल्सिअसपर्यंत राहिला. आज पुणे घाटमाथ्यासह उर्वरित पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 28 अंशापर्यंत वाढेल.

3/7
सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 0.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहिल. तसेच सातारा घाटमाथ्यासह संपूर्ण जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाची उघडीप राहिली. यावेळी कमाल तापमान 27.7 अंश सेल्सिअस नोंदवले असून पुढील 24 तासांत कमाल तापमान 30 अंशापर्यंत वाढेल. तसेच पुढील 24 तासांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

5/7
सोलापूर जिल्हात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप कायम आहे. यामुळे तापमानाचा पारा 32 पार गेला असून मागील 24 तासात 33 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज पुनहा पारा 33 अंशांवर राहण्याची शक्यता असून आकाश ढगाळ राहील.

6/7
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप राहिली. कमाल तापमानात घट होवून 28.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 31 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील.

7/7
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असली तरीही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढत आहे. राज्यात ऊन-सावल्यांसह ढगाळ वातावरण कायम आहे. सांगलीससह काही जिल्ह्यांत धुके पसरले आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीचा राहील. सकाळी धुके, पुन्हा हलका पाऊस तसेच दिवसभर ढगाळ वातावरण आणि कधी कडक उन्हाच्या उचक्यांनी मिश्र वातावरणाची स्थिती झाली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement