Pune News : महापालिकेने दाखवला इंगा! पावसाळ्यात मनमानी रस्ते खोदणाऱ्या व्यावसायिकावर दंड ठोठावला
Last Updated:
Pimpri Road Excavation Fine : भोसरीत पावसाळ्यात महापालिकेच्या आदेशांचे उल्लंघन करून रस्तेखोदाई केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला 81 लाख रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. पावसाळ्यात रस्तेखोदाईवर बंदी असून नियम मोडल्यास कारवाई होणार आहे.
पिंपरी : पावसाळ्याच्या काळात शहरातील रस्ते खोदण्याबाबत कठोर नियम असूनही, भोसरीत एका बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने 15 मे ते 15 ऑक्टोबरपर्यंत अत्यावश्यक नसलेल्या खोदकामास बंदी घातली आहे. मात्र, भोसरी एमआयडीसी परिसरातील एका व्यावसायिकाने विद्युत केबल बसवण्यासाठी पावसाळ्यात रस्तेखोदाई केली. यामुळे महापालिकेने त्याला 80 लाख 93 हजार 868 रुपये इतका दंडात्मक कारवाई नोटीस जारी केला आहे.
संबंधित व्यावसायिकाला दंड भरण्यास पाच दिवसांची मुदत दिली होती, परंतु अद्याप तो दंड भरण्यात आलेला नाही. पावसाळ्यात शहरातील रस्ते आणि पदपथ नुकसानापासून वाचविण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी रस्तेखोदाईवर बंदी घालली आहे. तथापि, अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे महापालिकेच्या निरीक्षणात आले आहे.
भोसरीतील लांडेवाडी रस्त्यावर एमआयडीसी चौकाजवळ केलेल्या खोदकामाची नागरिकांनी तक्रार केल्यावर महापालिकेने तातडीने काम थांबविले. 'ह' क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाच्या निरीक्षणात २३७ मीटर लांबीची खोदाई झाल्याचे आढळले. या निष्कर्षानुसार दंडात्मक कारवाई नोटीस जारी करण्यात आली. नोटीसानुसार, पाच दिवसांत दंड भरणे आवश्यक असून, त्याची पावती स्थापत्य विभागाकडे सादर करावी लागेल.
advertisement
उर्वरित खोदकाम केवळ स्थापत्य विभागाच्या पूर्वपरवानगीनेच करता येईल, अन्यथा नियमानुसार पुढील कारवाई होईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिकाने अद्याप दंड भरल्याशिवाय प्रकल्पास भोगवटा प्रमाणपत्र मिळणार नाही, असे उपअभियंता महेंद्र देवरे यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या नियमांनुसार पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि विद्युतविषयक अत्यावश्यक कामांसाठीच पावसाळ्यात खोदाईस परवानगी आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते. भोसरी एमआयडीसीमध्ये नियम मोडल्याचे लक्षात येताच महापालिकेने तत्काळ काम थांबवून संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
advertisement
शहरातील रस्ते सुरक्षित ठेवणे आणि नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने या कठोर निर्णयाद्वारे स्पष्ट संदेश दिला आहे की पावसाळ्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 9:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : महापालिकेने दाखवला इंगा! पावसाळ्यात मनमानी रस्ते खोदणाऱ्या व्यावसायिकावर दंड ठोठावला