Gold Silver Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच खूशखबर! पुन्हा घसरले सोन्या-चांदीचे दर, 1 ग्रॅमला किती मोजावे लागणार?

Last Updated:

Gold Silver Price Today: गेल्या एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ९८० रुपयाने घसरला होता तर २२ कॅरेट सोन्याचा दर तब्बल १,१६० रुपयाने कमी झाला होता.

News18
News18
Gold Price Today News in Marathi: लग्न सराईचे दिवस आले आहेत, त्यामुळे सोनं खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. तुम्ही जर लग्नासाठी सोनं घेत असाल तर हा वेळ सर्वात बेस्ट आहे. मागच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. यावेळी आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सकाळी सोन्याचे दर घसरले आहेत. सोने-चांदी खरेदी करण्याची तयारी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. देशात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. १० नोव्हेंबर २०२५ रोजी राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२२,१६० प्रति १० ग्रॅमवर दर पोहोचला आहे.
गेल्या एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ९८० रुपयाने घसरला होता तर २२ कॅरेट सोन्याचा दर तब्बल १,१६० रुपयाने कमी झाला होता. घसरणीमागे जागतिक स्तरावरील उलाढाल हे मोठं कारण आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या मागणीत घट होण्यामागे जागतिक कारणं आहेत. अमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि फेडरल रिझर्व्हने वेट अँड वॉच अशी भूमिका घेतल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत दरांवर दिसून येत आहे.
advertisement
देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे ताजे दर
मुंबई - २२ कॅरेट 111840 रुपये प्रति तोळा २४ कॅरेट 122010 रुपये प्रति तोळा
दिल्ली - २२ कॅरेट 111990 रुपये प्रति तोळा २४ कॅरेट 122160 प्रति तोळा
कोलकाता - २२ कॅरेट 111840 रुपये प्रति तोळा २४ कॅरेट 122010 प्रति तोळा
चेन्नई - २२ कॅरेट 111840 रुपये प्रति तोळा २४ कॅरेट 122010 प्रति तोळा
advertisement
इंडियन बुलियन असोसिएशनच्या मते मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचे दर 123106 रुपये प्रति तोळा
23 कॅरेट सोन्याचे दर 117980 रुपये प्रति तोळा
22 कॅरेट सोन्याचे दर 112873 रुपये प्रति तोळा
20 कॅरेट सोन्याचे दर 102610 रुपये प्रति तोळा
18 कॅरेट सोन्याचे दर 92354 रुपये प्रति तोळा
14 कॅरेट सोन्याचे दर 71835 रुपये प्रति तोळा
advertisement
एक ग्रॅम सोन्यासाठी किती मोजावे लागणार
24 कॅरेट सोन्याचे दर 12,201 रुपये प्रति ग्रॅम
22 कॅरेट सोन्याचे दर 11,184 रुपये प्रति ग्रॅम
18 कॅरेट सोन्याचे दर 9,151 रुपये प्रति ग्रॅम
चांदीच्या दरातही मोठी घटसोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव १,५२,४०० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा हाजिर भाव ४८.४८ डॉलर प्रति औंस इतका आहे.सोन्याची किंमत वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज कायमसोन्याचे दर सध्या कमी झाले असले तरी, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकांनी सोन्याच्या भविष्यातील दरांबद्दल सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे.
advertisement
तज्ज्ञांच्या मते सोन्या चांदीचे दर कुठे जाणार?
गोल्डमॅन सॅक्स: डिसेंबर २०२६ पर्यंत सोन्याचा भाव $४,९०० प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतो.
एएनझेड (ANZ): पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सोने $४,६०० प्रति औंस पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
डीएसपी मेरिल लिंच: सोन्यामधील तेजी अद्याप संपलेली नाही, असे मत.सोन्या-चांदीच्या देशांतर्गत किंमतींवर देशांतर्गत घटकांसह जागतिक घटकांचाही परिणाम होतो. सध्याचा दर कमी झाल्याने गुंतवणूकदारांना खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. असा दावा केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच खूशखबर! पुन्हा घसरले सोन्या-चांदीचे दर, 1 ग्रॅमला किती मोजावे लागणार?
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement