तुमचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार की नाही? घरांच्या किमतींमध्ये तब्बल 'इतक्या' टक्के वाढ, कुठे आहे सर्वाधिक पसंती ?

Last Updated:

Property Rules : नवी मुंबईत गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांच्या जोरावर रिअल इस्टेट बाजाराने वेग घेतला असून, सरत्या पाच वर्षांच्या कालावधीत येथील मालमत्तांच्या दरात सुमारे 22 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे.

Property Rules
Property Rules
मुंबई : नवी मुंबईत गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांच्या जोरावर रिअल इस्टेट बाजाराने वेग घेतला असून, सरत्या पाच वर्षांच्या कालावधीत येथील मालमत्तांच्या दरात सुमारे २२ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबईनवी मुंबई अटल सेतू यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे या परिसराचा विकास वेगाने घडत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
advertisement
२०२० साली नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये सरासरी प्रति चौरस फूट घरांचे दर सुमारे १४ हजार ८०० रुपये इतके होते. मात्र, पायाभूत सुविधा, दळणवळणाची सुधारलेली साधने आणि रोजगाराच्या नव्या संधी यांमुळे मागणी वाढत गेली. परिणामी, सध्याच्या घडीला नवी मुंबईतील सरासरी दर प्रति चौरस फूट सुमारे १८ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, नवी मुंबईचा बदललेला चेहरामोहरा यामागे महत्त्वाचा घटक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
विशेषतः मुंबईनवी मुंबई अटल सेतू प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील अंतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. प्रवासाचा वेळ घटल्याने नवी मुंबईत राहून मुंबईत काम करणे अधिक सोयीचे झाले आहे. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असल्याने भविष्यात या परिसराचे महत्त्व आणखी वाढणार, अशी अपेक्षा घरखरेदीदारांमध्ये दिसून येते. विमानतळामुळे व्यवसाय, लॉजिस्टिक, पर्यटन आणि सेवा क्षेत्रांना चालना मिळणार असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी आधीच नवी मुंबईकडे मोर्चा वळवला आहे.
advertisement
कोणत्या भागांना सर्वाधिक पसंती?
सर्वेक्षणानुसार, घर खरेदीसाठी ग्राहकांनी प्रामुख्याने वाशी, कोपरखैरणे, सीवूड, नेरूळ आणि खारघर या परिसरांना अधिक पसंती दिली आहे. या भागांमध्ये शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मॉल्स आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी यांसारख्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे कुटुंबांसाठी हे परिसर आकर्षक ठरत आहेत. तसेच नवी मुंबईत माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, लॉजिस्टिक, डेटा सेंटर्स आणि कॉर्पोरेट कार्यालयांची संख्या वाढत आहे. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुण वर्गानेही नवी मुंबईत घर घेण्यास प्राधान्य दिल्याचे विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे.
advertisement
दरवाढीचा वेग पाहता, २०२४ ते २०२५ या एका वर्षाच्या कालावधीतच मालमत्तांच्या किमतींमध्ये सुमारे ४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ बाजारातील स्थिर मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. आगामी काळात विमानतळ सुरू होणे, मेट्रो प्रकल्पांचा विस्तार आणि नव्या व्यावसायिक संकुलांची उभारणी यामुळे नवी मुंबईतील रिअल इस्टेट बाजार अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
तुमचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार की नाही? घरांच्या किमतींमध्ये तब्बल 'इतक्या' टक्के वाढ, कुठे आहे सर्वाधिक पसंती ?
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement