advertisement

तुम्हालाही स्वस्त Home Loan हवंय? समजून घ्या यासाठी किती असावा Cibil Score

Last Updated:

Home Loan : सध्याच्या काळात घरं घ्यायचं म्हटलं होम लोन घेणं हे गरजेचं झालंय. जास्तीत जास्त लोक हे घर घेण्यासाठी होम लोन घेतात. पण होम लोन स्वस्तात कसं मिळतं चला याविषयी जाणून घेऊया.

होम लोन
होम लोन
मुंबई : आजकाल बहुतेक लोक घर घेण्यासाठी Home Loan घेतात. तुम्हाला Home Loan मिळणार की नाही आणि ते तुम्हाला किती व्याजदराने द्यायचे हे बँका तुमचा सिबिल रिपोर्ट पाहून ठरवतात. तुमचा CIBIL स्कोर पाहून बँका तुमची विश्वासार्हता तपासतात. या व्यतिरिक्त काही घटक असले तरी CIBIL हा सर्वात महत्वाचा घटक आहे. म्हणूनच, जर तुम्हाला स्वस्त व्याजदराने Home Loan घ्यायचे असेल, तर तुमचा सिबिल स्कोअर मेंटेन ठेवा. यासाठी तुमचा CIBIL स्कोर काय असावा हे जाणून घ्या.
CIBIL स्कोर महत्त्वाचा का आहे?
CIBIL स्कोअर हा रिपोर्ट कार्डसारखा असतो. CIBIL स्कोअर अर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री उघड करतो आणि त्याचा लोन बिहेवियर तपासला जातो. CIBIL स्कोअरचा स्कोअर 300 ते 900 दरम्यान आहे. जितका चांगला स्कोअर असेल तुम्हाला लोनही तेवढ्याच चांगल्या व्याजदराने मिळेल.
advertisement
हे आहे CIBIL स्कोअरचे पॅरामीटर
ग्राहकाचा CIBIL स्कोर 300 ते 550 च्या दरम्यान असेल तर तो वाईट मानला जातो. 550 ते 650 च्या दरम्यान आहे, ते सरासरी मानले जाते. जर ते 650 ते 750 च्या दरम्यान असेल तर ते चांगले मानले जाते आणि जर ते 750 ते 900 च्या दरम्यान असेल तर ते खूप चांगले मानले जाते.
advertisement
स्वस्त होम लोनसाठी CIBIL स्कोअर किती असावा?
तज्ञांच्या मते, होम लोनसाठी तुमचा CIBIL स्कोर 550 ते 650 च्या दरम्यान असेल तर तो सरासरी मानला जाईल. अशा परिस्थितीत बँका तुम्हाला कर्ज देऊ शकतात किंवा नाकारू शकतात. पण जर CIBIL स्कोर 650 ते 750 च्या दरम्यान असेल तर बँका त्याचा विचार करून कर्ज देतात. जर CIBIL स्कोअर 750-900 च्या दरम्यान असेल, तर बँक अर्जदाराला कोणत्याही विलंबाशिवाय सर्वोत्तम व्याजदराने कर्ज देऊ करेल.
advertisement
CIBIL स्कोअर खूप कमी असल्यास काय?
CIBIL स्कोर कमी असेल तर समस्या वाढेल. बँकेकडून कर्ज मिळणे कठीण होईल. कर्ज मंजूरी/नामंजुरी क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. गुण कमी असल्यास, कर्ज नाकारले जाण्याची शक्यता जास्त असते. कमी स्कोअरचाही कर्जाच्या रकमेवर परिणाम होतो. म्हणजे, कर्ज मंजूर झाले असले तरी, कदाचित तुम्हाला हवी असलेल्या रकमेसाठी मंजुरी मिळू शकत नाही.
advertisement
CIBIL स्कोर कोण तयार करतो?
सर्व क्रेडिट ब्युरो CIBIL स्कोर जारी करतात. यामध्ये ट्रान्सयुनियन CIBIL, Equifax, Experian आणि CRIF Highmark सारख्या क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या प्रमुख मानल्या जातात, या कंपन्यांना लोकांचे आर्थिक रेकॉर्ड गोळा करण्यासाठी, त्याची देखभाल करण्यासाठी आणि या डेटावर आधारित क्रेडिट रिपोर्ट/क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी लायसन्स दिला जातो.
खराब CIBIL स्कोअर कसा सुधारायचा
कोणत्याही प्रकारचे कर्ज वेळेवर भरा. होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचा वापर यामध्ये समन्वय ठेवा. क्रेडिट कार्डचे बिल भरा. क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी ठेवा. क्रेडिट कार्डवर कर्ज घेणे टाळा. क्रेडिट स्कोअर वेळोवेळी तपासा.
view comments
मराठी बातम्या/मनी/
तुम्हालाही स्वस्त Home Loan हवंय? समजून घ्या यासाठी किती असावा Cibil Score
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement