Loan घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँक कोणाकडून कर्ज वसुल करते? घ्या जाणून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
लोक कर्ज घेतात पण अनेकदा कर्ज फेडण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू होतो. अशा वेळी त्यांचं कर्ज बँका कोणाकडून वसुल करतात याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई : तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर एखाद्या व्यक्तीने बँकेकडून घर, कार किंवा इतर कोणतेही कर्ज घेतले आणि कर्जाच्या कालावधीत काही कारणास्तव त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर ती रक्कम बँक कोणाकडून वसूल करणार? कर्ज घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर बँक कर्ज माफ करते, असा अनेकांचा समज आहे. मात्र, यात तथ्य नाही. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही बँक कर्ज वसूल करते. बँक कोणाकडून कर्ज वसूल करते ते जाणून घेऊया.
होम लोन
होम लोनच्या बाबतीत, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, बँक प्रथम सह-कर्जदाराशी संपर्क साधते. त्याला थकीत कर्जाची परतफेड करण्यास सांगते. जर कोणीही सह-कर्जदार उपस्थित नसेल, तर बँक कर्जाच्या जामीनदाराकडे किंवा परतफेडीसाठी कायदेशीर वारसाकडे वळते. जर व्यक्तीने कर्जाचा विमा काढला असेल, तर बँक विमा कंपनीला कर्ज भरण्यास सांगते. हे सर्व ऑप्शन उपलब्ध नसल्यास, बँक थकित कर्ज वसूल करण्यासाठी मालमत्तेचा लिलाव करण्यास मोकळी आहे.
advertisement
कार लोन
कार लोनच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाल्यास, बँक उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी कर्जदाराच्या कुटुंबाशी संपर्क साधते. कायदेशीर वारसाने उर्वरित कर्जाची रक्कम देण्यास नकार दिल्यास, बँकेला वाहन पुन्हा ताब्यात घेण्याचा आणि त्याचे नुकसान भरून काढण्यासाठी लिलावात विकण्याचा अधिकार आहे.
advertisement
पसर्नल आणि क्रेडिट कार्ड कर्ज
सुरक्षित कर्जाच्या विपरीत, असुरक्षित कर्जे, जसे की पसर्नल किंवा क्रेडिट कार्ड लोन, कर्जाच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाल्यास, बँक थकित रकमेसाठी कायदेशीर वारस किंवा कुटुंबातील सदस्यांवर दबाव आणू शकत नाही. सह-कर्जदार उपस्थित असल्यास, बँक त्या व्यक्तीविरुद्ध वसुलीची कार्यवाही सुरू करू शकते. मात्र, सह-कर्जदार नसताना आणि कर्ज वसूल करण्याचे कोणतेही पर्यायी साधन नसताना, बँक या कर्जाचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (NPA) मध्ये रुपांतर करते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 22, 2024 5:04 PM IST