'हा फक्त ट्रेलर होता, अजून बरंच काही बाकी'; Dhurandharच्या स्टार अभिनेत्याकडून पार्ट 2ची Release डेट जाहीर
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Dhurandhar 2 Release Date: ‘धुरंधर’ चित्रपटावर होत असलेल्या टीकेवर अखेर अभिनेता आर. माधवनने मौन सोडले. चित्रपटामुळे वाद होईल याची कल्पना आधीच होती, असे सांगत त्याने धुरंधर पार्ट 2 कधी प्रदर्शित होणार याची तारीख जाहीर केली.
मुंबई: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट जबरदस्त कमाई करत असतानाच, सोशल मीडियावर आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर त्याला मिळालेल्या नकारात्मक रिव्ह्यूजवरही मोठी चर्चा होत आहे. या सगळ्या वादावर आता चित्रपटातील महत्त्वाचा अभिनेता आर. माधवनने प्रथमच मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत आर. माधवन म्हणाला की, चित्रपटावर अशी प्रतिक्रिया येईल याची त्यांना आधीच कल्पना होती. हा चित्रपट समाजावर परिणाम करणार आहे, हे मला माहीत होतं. काही लोक सुरुवातीला फार वाईट रेटिंग देतील, तर काही लोक नंतर चित्रपट पाहून म्हणतील; अरे, असंही काही घडलं आहे. ही गोष्ट आपण कुणावर राग व्यक्त करण्यासाठी सांगत नाहीत, तर कलाकार म्हणून बदलाची गरज असल्याचे मला वाटते.
advertisement
मला लोकांनी नेहमी हिरो म्हणून पाहावं असं नाही. मी स्वतःला हिरो मानतो, पण प्रेक्षकांनी तसं पाहावं, यासाठी मला बदल करायला हवा. हा बदल फक्त माझ्यासाठी नाही, तर संपूर्ण इंडस्ट्रीसाठी आवश्यक आहे. म्हणूनच मला वाटलं होतं की ‘धुरंधर’ हा चित्रपट आयकॉनिक ठरणार आहे. ज्या भूमिकेत मला दाखवलं गेलं, त्याचं पूर्ण श्रेय निर्मात्यांना जाते, असे ही माधवनने सांगितले.
advertisement
प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याचं ‘मृत्यूपत्र’ लिहिलं गेलं आणि रिलीज होताच त्याच्यावर टीका करण्यात आली. तेव्हा कुठेतरी अजेंडा आहे का? असा प्रश्न पडतो. मात्र कलाकार म्हणून आम्ही अशा परिस्थितीतूनच मी मजबूत होतो, असे त्याने सांगितले.
‘धुरंधर पार्ट 2’ बद्दल बोलताना माधवनने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. मी फार काही सांगू शकत नाही, पण पहिला भाग हा फक्त ट्रेलरसारखा होता. अजून बरंच काही पाहायचं बाकी आहे, असे तो म्हणाला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 10:05 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'हा फक्त ट्रेलर होता, अजून बरंच काही बाकी'; Dhurandharच्या स्टार अभिनेत्याकडून पार्ट 2ची Release डेट जाहीर








