Vaibhav Suryavanshi : LIVE सामन्यात युएईच्या विकेटकिपरचा ड्रामा, वैभवला नको नको ते बोलला, शेवटी बोलतीच बंद केली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सामन्यात एक मोठा राडा झाला आहे. युएईच्या विकेटकिपरने वैभव सूर्यवंशीला स्लेजिंग करत नको नको ते बोलला आहे. विकेटकिपरच्या या वागण्यावर आता वैभव सूर्यवंशीने प्रतिक्रिया देऊन त्याची बोलती बंद केली आहे.
Vaibhav Suryavanshi News : अंडर 19 आशिया कप स्पर्धेत आज भारताच्या 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीने 171 धावांची वादळी खेळी करून धमाकेदार सुरूवात केली होती. वैभवच्या या खेळीमुळे टीम इंडियाने हा सामना 234 इतक्या मोठ्या फरकाने जिंकला आहे. या सामन्यात एक मोठा राडा झाला आहे. युएईच्या विकेटकिपरने वैभव सूर्यवंशीला स्लेजिंग करत नको नको ते बोलला आहे. विकेटकिपरच्या या वागण्यावर आता वैभव सूर्यवंशीने प्रतिक्रिया देऊन त्याची बोलती बंद केली आहे.
अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारत अ आणि युएई आमने सामने आले होते. या सामन्यात टीम इंडियाच्या प्रथम फलंदाजी दरम्यान मोठा राडा झाला होता. युएईचा विकेटकिपर सालेह अमीन विकेट मागून टीम इंडियाच्या फलंदाजांना स्लेजिंग करत होता. युएईच्या विकेटकिपरने वैभव सूर्यवंशीला देखील स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचे सगळे प्रयत्न वैभव सूर्यवंशीने हाणून पाडत 171 धावांची वादळी खेळी केली होती. 95 बॉलमध्ये त्याने या धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 14 षटकार आणि 9 चौकार लगावले होते.
advertisement
दरम्यान सामन्यानंतर ज्यावेळेस वैभव सूर्यवंशीला स्लेजिंग बाबत विचारण्यात आले, त्यावेळेस तो म्हणाला, "नाही, सर्वप्रथम, मी बिहारचा आहे. माझ्या पाठीमागे कोणी काही बोलते याचा काही फरक पडत नाही,अशा शब्दात वैभवने त्याची बोलती बंद केली आहे. तसेच बोलणे हे यष्टीरक्षकाचे काम आहे.मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत होतो. मी नेहमी जे करतो तेच केले,असे वैभव सूर्यवंशी या ड्राम्यावर बोलला आहे.
advertisement
कसा रंगला सामना
अंडर 19 आशिया कप 2025च्या पहिल्याच सामन्यात भारताच्या अ संघाने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 433 धावा केल्या होत्या.त्यामुळे युएई अ संघासमोर 434 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना युएईची सुरूवात खूपच खराब झाली होती. कारण युएईचे 53 धावांमध्येच 6 विकेट पडले होते. त्यामुळे युएई ऑलआऊट होईल असे वाटत होते. पण या पृथ्वी मधूने 50 धावांची तर उद्दीश सूरीने 78 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यामुळे युएई 50 ओव्हरमध्ये फक्त 7 विकेट गमावून 199 धावा करू शकली होती. त्यामुळे भारताने हा सामना 234 धावांनी जिंकला आहे.
advertisement
दरम्यान भारताकडून वैभव सूर्यवंशीने 95 बॉलमध्ये 171 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 14 षटकार आणि 9 चौकार लगावले होते. त्याच्यासोबत अरॉन जॉर्जने 69 धावांची खेळी केली होती. त्यामुळे दोघांमध्ये 212 धावांची पार्टनरशीप झाली होती.त्यामुळे जितक्या धावांची वैभव आणि अरॉन जॉर्जची पार्टनरशीप झाली होती.तितक्याच धावात युएईचा संघ गार झाला आहे. त्यामुळे भारताचे हे दोनच खेळाडू युएई्च्या संघाला पूरून उरले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 9:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : LIVE सामन्यात युएईच्या विकेटकिपरचा ड्रामा, वैभवला नको नको ते बोलला, शेवटी बोलतीच बंद केली









