HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेटची शेवटची तारीख टळली, तर किती दंड भरावा लागेल?

Last Updated:

HSRP नंबर प्लेटसाठी 30 नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. अर्ज न केल्यास 10 हजार, उशीर झाल्यास 1000 रुपये दंड. विनोद सगरे यांनी नियम स्पष्ट केले आहेत. फसवणुकीपासून सावध रहा.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
तुम्ही तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेतली का? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी अर्ज केला नसेल तर लगेच करा. याचं कारण म्हणजे जर तुम्ही अर्ज केला नाहीत आणि शेवटची तारीख निघून गेली तर तुम्हाला भलामोठा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही लगेच ही प्रक्रिया करायला सुरुवात करा. 2019 पूर्वी ज्यांनी वाहानं घेतली आहेत, त्यांना HSRP नंबर प्लेट बसवून घेणं बंधनकारक आहे.
या नंबरप्लेटसाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. यासाठी कोणतीही मुदतवाढ तूर्तास देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणताही उशीर न करता तुम्ही अर्ज करायला सुरुवात करा. नाहीतर भलामोठा दंड भरावा लागेल. तुम्ही जर अर्ज करायला टाळाटाळ केलीत तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. 30 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज केला पण तुम्हाला नंबर प्लेट मिळायला उशीर झाला तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.
advertisement
प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी स्पष्ट केलं आहे की, ३० नोव्हेंबर २०२५ हीच अंतिम तारीख आहे. त्यानंतर नंबर प्लेट बसवली नसेल तर ज्यांनी अर्ज केला आहे पण त्यांना नंबरप्लेट मिळाली नाही किंवा काही अडचणी आल्या तर 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल. मात्र अर्जही केला नसेल तर नियमाप्रमाणे 10 हजार रुपये दंड भरणं आवश्यक आहे. यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. याआधी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा जानेवापरीपर्यंत मुदतवाढ मिळणार का ते पाहावं लागणार आहे.
advertisement
जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र ३० नोव्हेंबरनंतर जर कारवाई सुरू झाली, तर उशीर झालेल्या वाहनधारकांचा खिसा नक्कीच हलका होईल. त्यामुळे खबरदारी घ्या आणि तुमच्या गाडीवर लवकरात लवकर HSRP बसवा. नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. HSRP साठी तुम्ही गडबडीत अर्ज कराल तर फसाल, अधिकृत वेबसाईटवरुनच अर्ज करा. कारण नव्या नंबरप्लेटच्या नावाखाली एजंटमार्फत अनेकांकडून फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
advertisement
त्यामुळे केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळावरूनच नंबर प्लेटसाठी अर्ज करावा, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. पूर्वी HSRP बसवण्यासाठी फिटमेंट सेंटर कमी असल्याने अडचणी येत होत्या, मात्र आता 23 पेक्षा अधिक अधिकृत फिटमेंट सेंटर उभारण्यात आले आहेत. हे सगळं असलं तरीसुद्धा आतापर्यंत 40 टक्के लोकांनी नवीन नंबरप्लेट घेतली आहे. अजूनही तुम्ही घेतली नसेल तर तुमच्याकडे 17 दिवस शिल्लक राहिले आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेटची शेवटची तारीख टळली, तर किती दंड भरावा लागेल?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement