Dharashiv News : पांरपरिक व्यवसायातच केले प्रयोग, आज दिवाळीच्या हंगामात दिवसाला 1 लाखांची उलाढाल

Last Updated:

dharashiv business success story - धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील फरीद पठाण यांची ही कहाणी आहे. त्यांचा फटाके विक्रीचा हा पारंपारिक व्यवसाय आहे. चौथ्या पिढीपर्यंत हा व्यवसाय चालत आला होता. मात्र, फटाके विक्रीच्या व्यवसायातून फारसे उत्पन्न हाती लागत नव्हते.

+
धाराशिव

धाराशिव बिझनेस सक्सेस स्टोरी

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव - महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील फटाका विक्रीचा व्यवसाय महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तेथील एका व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत. व्यवसाय करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. मात्र, ते खचले नाहीत. आज ते आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील फरीद पठाण यांची ही कहाणी आहे. त्यांचा फटाके विक्रीचा हा पारंपारिक व्यवसाय आहे. चौथ्या पिढीपर्यंत हा व्यवसाय चालत आला होता. मात्र, फटाके विक्रीच्या व्यवसायातून फारसे उत्पन्न हाती लागत नव्हते. त्यातून फारशी आर्थिक प्रगती होत नव्हती. त्यामुळे फरीद पठाण यांनी कराटे क्लासेसला सुरुवात केली. त्यानंतर अंडे विक्रीचाही काही कालावधीसाठी व्यवसाय केला. मात्र, त्यातूनही फारशी आर्थिक प्रगती होत नव्हती.
advertisement
त्यानंतर वडिलोपार्जित चालत आलेला फटाका विक्रीचा व्यवसाय त्यांनी पुन्हा वाढवला आणि या व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न केले. त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले आणि आता दिवाळीच्या हंगामात दिवसाकाठी 1 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
भुलाबाईच्या खिरापतीसाठी बनवू शकता हे 5 पदार्थ, सोपी रेसिपी, नेमकं काय कराल?
फरीद पठाण यांचा प्रिन्स फायर वर्क्स नावाने असलेला फटाका विक्रीचा व्यवसाय प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या व्यवसायाची उलाढाल वाढली असून दिवाळीच्या हंगामात दिवसाकाठी 1 लाख रुपयांची उलाढाल होत आहे आणि त्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्नही मिळत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
कितीही अडचणी आल्या, संकटे आली पण जिद्द असेल तर एक दिवस यश नक्की मिळते हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. त्यांचा हा प्रवास निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या/मनी/
Dharashiv News : पांरपरिक व्यवसायातच केले प्रयोग, आज दिवाळीच्या हंगामात दिवसाला 1 लाखांची उलाढाल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement