Gold Silver Price: इस्रायल युद्धामुळे महागाईचा भडका! चांदी ३ लाखांचा दर गाठण्याचा अंदाज, सोनं किती महागणार? सोमवारी बाजारात उलथापालथीचे संकेत
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gold Silver Price: अमेरिकेने केलेल्या मोठ्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेत घबराटीचे वातावरण पसरले आहे.
Israel Iran War and Gold Silver Price: मध्य पूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले आहे. २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या मोठ्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेत घबराटीचे वातावरण पसरले आहे. या युद्धामुळे शेअर बाजार कोसळण्याची भीती असून, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीच्या दरांनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे.
खामेनींच्या मृत्यूनंतर तणाव वाढला
इराणने आपल्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतर प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत. यामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली असून, अमेरिकन डॉलर आणि बाँड मार्केटमध्येही मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. गुंतवणूकदार आता 'रिस्की' गुंतवणुकीपेक्षा सरकारी बाँड्स आणि मौल्यवान धातूंना पसंती देत आहेत.
सोन्या-चांदीचा ऐतिहासिक उच्चांक?
युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसा काढून सोन्यात गुंतवत आहेत. दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात १,८०० रुपयांची वाढ होऊन तो १,६४,७०० रुपयांवर पोहोचला. मात्र, बाजारातील वाढती मागणी पाहता, येत्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,७५,००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दुसरीकडे, चांदीचा दरही प्रति किलो ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे आहेत.
advertisement
सोमवारी शेअर बाजारात काय होणार?
येत्या सोमवारपासून (२ मार्च) शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते. युद्धाचा भडका उडाला तर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. सोन्या-चांदीचे दर हे प्रामुख्याने युद्धाच्या बातम्या, अमेरिकन डॉलरची हालचाल आणि जागतिक बँड यील्डवर अवलंबून असतील. जर हा संघर्ष शांत झाला नाही, तर सामान्यांच्या खिशाला सोन्याच्या वाढत्या किमतींचा मोठा फटका बसणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 11:48 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price: इस्रायल युद्धामुळे महागाईचा भडका! चांदी ३ लाखांचा दर गाठण्याचा अंदाज, सोनं किती महागणार? सोमवारी बाजारात उलथापालथीचे संकेत







