Multibagger Stock :एवढी मोठी चूक कशी काय झाली? 1 लाखाचे झाले 1,31,31,818; गुंतवणूकदारांचे डोळे चक्रावले, अजून संधी गेली नाही

Last Updated:

Multibagger Stock : शेअर बाजारात आरआरपी सेमीकंडक्टर या कंपनीच्या शेअरने अविश्वसनीय असा 12963% परतावा दिला आहे. एक वर्षापूर्वी 22 मध्ये मिळणारा हा शेअर आज 2889 च्या वर पोहोचला आहे. ज्यामुळे अनेक गुंतवणूकदार कोट्यवधींमध्ये पोहोचले आहेत.

News18
News18
मुंबई: शेअर बाजारात केव्हा कोणता शेअर चमक दाखवेल, हे सांगता येत नाही. बाजारात मजबूत वाटणारा शेअर कोसळू शकतो आणि पेनी स्टॉक मोठा फायदा देऊ शकतो. आरआरपी सेमीकंडक्टर (RRP Semiconductor) या शेअरच्या परताव्याने दिग्गज गुंतवणूकदारांनाही अचंबित केलं आहे. एक वर्षापूर्वी केवळ 22 रुपयांना मिळणारा हा मल्टीबॅगर शेअर आता 2800 च्या पलीकडे पोहोचला आहे. या शेअरने 12963% चा अविश्वसनीय परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. एक वर्षापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवलेले गुंतवणूकदार आता कोट्यधीश बनले आहेत. आजही या शेअरमध्ये अपर सर्किट लागले आहे.
आरआरपी सेमीकंडक्टर या शेअरने असा पराक्रम करून दाखवला आहे. ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. 24 जुलै 2024 रोजी कंपनीचा शेअर फक्त 22.12 रुपयांवर होता. तर एक वर्षाने, म्हणजेच 24 जुलै 2025 रोजी याचाच भाव वाढून 2889.60 रुपये झाला आहे. म्हणजेच एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 12963% चा प्रचंड परतावा दिला आहे. गुरुवारी या शेअरने 52 आठवड्यांचे नवे उच्चांक गाठले. कंपनीचे मार्केट कॅप गुरुवारी 3900 कोटी रुपयांच्या पलीकडे गेले आहे.
advertisement
2025 साली आत्तापर्यंत आरआरपी सेमीकंडक्टर या शेअरने 1457% ची जबरदस्त झेप घेतली आहे. फक्त काही महिन्यांत या शेअरने दिलेला परतावा बघता, तो बाजाराचा सुपरस्टार ठरला आहे. जर आपण थोडा कमी कालावधी पाहिला तरी या शेअरची कामगिरी तितकीच जबरदस्त आहे. 24 जानेवारी 2025 रोजी या शेअरचा भाव 259.20 रुपये होता. आणि फक्त 6 महिन्यांत 1015% वाढून तो 2889.60 पर्यंत पोहोचला.
advertisement
तीन महिन्यांत 255 टक्क्यांचा नफा
मागील 3 महिन्यांत कंपनीच्या शेअरमध्ये 255% ची जोरदार वाढ झाली आहे. जर 1 महिन्याची बाब विचारात घेतली. तर सुमारे 55% ची झपाट्याने वाढ झाली आहे. 30 दिवसांत हा शेअर 1869.55 वरून 2889.60 पर्यंत पोहोचला आहे. इतकंच नाही तर पाच ट्रेडिंग सेशन्समध्येही हा स्टॉक 8% पेक्षा जास्त वाढला आहे.
advertisement
3900 कोटींच्या पार गेले मार्केट कॅप
या झपाट्याच्या परिणामाचा प्रभाव कंपनीच्या मार्केट कॅपवरही दिसून येतो. गुरुवारी कंपनीचे मार्केट कॅप 3900 कोटी रुपयांच्या वर गेले आहे. एकेकाळी कंपनीचा शेअर फक्त 15 रुपयांवर होता. तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप फारच कमी होते. पण आता ही कंपनी मिडकॅप कॅटेगरीमध्ये पोहोचण्याच्या जवळ आहे.
गुंतवणूकदार झाले मालामाल
ज्यांनी या स्टॉकमध्ये एक वर्षापूर्वी फक्त 10,000 गुंतवले होते. त्यांची गुंतवणूक आता 13 लाखांहून अधिक झाली आहे. 1 लाखाचा गुंतवणूक आता 1.3 कोटी रुपये झाले. त्यामुळेच आज प्रत्येक गुंतवणूकदार या स्टॉकबद्दल चर्चा करत आहे.
advertisement
तज्ज्ञ काय सांगतात?
मात्र तज्ज्ञ सांगतात की, इतक्या प्रचंड वेगाने झालेल्या वाढीनंतर गुंतवणूकदारांनी थोडे अलर्ट राहणे आवश्यक आहे. कोणत्याही शेअरमध्ये जबरदस्त तेजी नंतर करेक्शन (भाव घट) येण्याची शक्यता असते. नफा बुकिंग करायची गरज भासत असेल, तर ती दुर्लक्ष करू नये.
(डिस्क्लेमर: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.)
view comments
मराठी बातम्या/मनी/
Multibagger Stock :एवढी मोठी चूक कशी काय झाली? 1 लाखाचे झाले 1,31,31,818; गुंतवणूकदारांचे डोळे चक्रावले, अजून संधी गेली नाही
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement